पणजी : ज्या ग्रामीण भाषा आहेत, त्याच खऱ्या भाषा आहेत. दुर्दैवाने इंग्रजी भाषेचे एवढे अतिक्रमण झाले आहे की, त्याला काहीही उपाय करता येत नाही. कारण आपण ज्यापद्धतीने जगत आहोत, त्यात प्रादेशिक भाषांचे अस्तित्व टिकणे हा मोठा मुद्दा आहे. पण इंग्रजी भाषेचा आपल्यावर फार मोठा प्रभाव आहे. आजही आपण इंग्रजीचे शब्द बोलताना वापरतो, आपलीच भाषा आपल्याला निट बोलता येत नाही. त्यामुळे विकास झाला की अधोगती झाली हेच आपल्याला कळत नाही, असे मत प्रख्यात अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
मराठी आणि कोकणी भाषेचा विचार केला तर या प्रश्नावर शिंदे यांनी वरील मत व्यक्त केले. ‘गोमन्तक'शी दिलखुलास गप्पा मारताना सयाजी यांनी भाषावादात न अडकता, आपल्यावर कोणत्या भाषेचा प्रभाव पडतोय याचा विचार लोक का करीत नाहीत, असा सवाल उपस्थित केला आहे. शिक्षण घेतले आहे, पण ज्यांनी पदव्या घेतल्या आहेत, त्यांना अजिबात अक्कल नाही असा जो शिक्षणक्षेत्राने घोळ घालून ठेवला आहे, तो चिंताजनक आहे. आपण गावगाडा आता पूर्णपणे बुडवन टाकला आहे. मनुष्यच माणसाचा आणि निसर्गाचा फार मोठा शत्रू झाला आहे आणि एकंदरित प्रकाराने मनुष्यजात सध्या अनियंत्रित स्थितीत जगत आहोत.
सध्या महाराष्ट्रात सयाजी यांनी सुरू केलेल्या झाडे लावण्याच्या चळवळीविषय ओघाने आलाच त्यावर ते म्हणाले की, प्रत्येकाला वाटलं पाहिजे की झाडे जगली पाहिजेत, म्हणून मी माझ्यापासून सुरवात केली आहे. किती झाडे लावता येतील तेवढे काम करूया, माणसाला सुधरविण्याची ताकद आपल्यात नाही, पण मी जेवढे निसर्गाचे नुकसान केले आहे, तेवढे नुकसान भरून काढले पाहिजे. सध्या विचार केला तर आई आणि झाड या दोन्हीच गोष्टी खऱ्या आहेत, अशा मुद्द्यापर्यंत मी पोहोचल्याचे सांगत सयाजी म्हणाले की, आपल्याला जगण्याला फक्त ऑक्सिजन आणि भाजीपाला या दोनच गोष्टी आवश्यक आहेत. आपलं आयुष्य हे आनंदी गेले पाहिजे, त्यासाठी डोळे उघडे ठेवून जगले पाहिजे. झाडे जगवण्यासाठी पाणी घातले जात नाही, उलट आपल्याकडे दगडावर जास्त पाणी घातले जाते हे दुर्दैव आहे. शहरं सुधारू शकत नाहीत, सुधारली तर गावेच सुधारतील. खेड्यांना, शेतकऱ्यांना कमी किंमत दिली जाते आणि हे मोठे दुःख आहे, असे त्याने परखडपणे नमूद केले.
मराठी, हिंदी आणि आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवत असल्याबद्दल विचारणा केली असता, सयाजी म्हणाले, तामिळमध्ये सध्या माझे दोन चित्रपट प्रदर्शीत झाले आहेत. त्यात ‘ॲक्शन' हा प्रदर्शित झाला आहे, मार्केटराजा प्रदर्शीत होत आहे. तेलगूमध्ये ‘रुलर', तर मराठीमध्ये ‘बाई‘ नावाचा चित्रपट प्रदर्शीत होणार आहेत. सरसकट चित्रपट करणे हा आवडीचा भाग होता, पण आता हे सोडून झाडे लावणे त्यावरच काम करायला पाहिजे, असे वाटते.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |