सातारा : कोडोली येथील कृष्णाधाम, दत्तनगर परिसरात ओढय़ाच्या कडेला जुगार खेळणाऱ्या सातजणांवर कारवाई केली आहे. या छाप्यात संशयितांकडून रोख रक्कम, ५ मोबाईल, ५ दुचाकी व जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख २४ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ रोजी सायंकाळी कोडोली येथील कृष्णाधाम, दत्तनगर परिसरात ओढय़ानजिक एके ठिकाणी काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिथे छापा टाकला.
यावेळी तिथे जुगार खेळत असलेल्या चंद्रकांत लक्ष्मण साळुंखे (वय ६०) सुनील गुलाबराव साळुंखे (वय ५३) संतोष भिकू काळभोर, राजेंद्र गणपती पवार चौघेही रा. कोडोली, ता. सातारा तसेच प्रकाश बंडू आवळे (वय ६५) रा. कोयना सोसायटी, सदरबझार, सातारा, संतोष बबन शेळके (वय ४१) रा. खिंडवाडी, सातारा व महादेव अंतू शेडगे (वय ६०) रा. धनगरवाडी, सातारा हे जुगार खेळत होते. यावेळी कारवाई पथकाने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील रोख रक्कम, ५ मोबाईल, ५ दुचाकी व जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख २४ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी अभय साबळे, गणेश घाडगे, किशोर तारळकर, शिवाजी भिसे यांनी सहभाग घेतला.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |