02:28am | Jun 21, 2019 |
सातारा : सातारा- जावली मतदारसंघात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंजावात सुरु असून नुकत्याच सुरु असलेल्या अधिवेशनात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुक्यातील सहा विकासकामांसाठी तब्बल 9 कोटी 58 लाख रुपये तर, जावली तालुक्यातील बहुचर्चीत कुडाळ ते पाचगणी रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 2 कोटी 50 लाख असा एकूण 12 कोटी 8 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे.
अधिवेशन सुरु असून नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या सात विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूद करुन घेतली आहे. जावली तालुक्यातील कुडाळ ते पाचगणी या रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी (0/200 ते 17/00) अर्थसंकल्पात 2 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सातारकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या किल्ले अजिंक्यतार्यावर जाणार्या गोडोली (साईबाबा मंदीर चौक), रामराव पवार नगर, गोळीबार मैदान वसाहत, जगतापवाडी, शाहू चौक ते अजिंक्यतारा किल्ला (प्रजिमा 30) या रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 48 लाख रुपये, याच रस्त्यावरील छोट्या पुलाजवळ संरक्षक भिंत बांधण्यासाठी 30 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
सातारा तालुक्यातील सातारा, कास ते बामणोली (प्रजिमा 26) या 20/00 ते 28/00 किमी रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी 3 कोटी 50 लाख, सातारा, गजवडी ते ठोसेघर, चाळकेवाडी रस्त्याचे (7/00 ते 11/500 किमी.) मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी 2 कोटी 30 लाख, लिंबखिंड ते खिंडवाडी रस्ता प्र.जि.मा. 30 (1/200 ते 1/800 व 3/00 ते 5/600 किमी) या रस्त्याचे मजबुतीकरण आणि खडीकरण करण्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्य मार्ग 140 ते सोनगांव, कुमठे, आसनगांव रस्ता प्र.जि.मा. 31 (0/00 ते 0/600, 1/600 ते 1/800, 3/600 ते 5/400 आणि 9/200 ते 9/750 किमी) या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
तातडीने शासकीय सोपस्कार पुर्ण करुन निवीदा प्रक्रिया राबवा. त्वरीत वर्क ऑर्डर काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा आणि सर्व कामे दर्जेदार करा, अशा सक्त सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना केल्या आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |