कराड : आपल्या आई-वडिलांनी खूप कष्ट करून आपल्याला उच्च शिक्षण दिले आहे, हे विसरू नका. ज्या माळरानावर कुसळे उगवत नाहीत तिथे तुम्हाला समृद्ध शिक्षण मिळत आहे, हे समाजाने पुरवले आहे. ज्या समाजामुळे आपण उभे आहे, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव ठेवून कार्य केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे यांनी व्यक्त केले.
श्री संतकृपा शिक्षण संस्था घोगाव (ता.कराड) येथे फार्मसी व शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांच्याहस्ते स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. यावेळी शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ.ईला जोगी, संस्थेचे सीईओ प्रदीप कबाडे, प्राचार्या डॉ.प्रज्ञा पाटील, प्राचार्य डॉ.विजयानंद आरलेलीमठ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सीईओ प्रदीप कबाडे होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.साळुंखे पुढे म्हणाले, पदवीनंतरचे जीवन आयुष्याची पहिली पायरी आहे. या मार्गात खूप अडथळे पार करावे लागतील, अविरत कष्ट करावे लागेल. याप्रसंगी विचारपूर्वक काम करा, स्वतःचे जीवन समृद्ध करा व आपले कर्तव्य सिद्ध करा. स्वतःच्या कुटुंबाच्या प्रगतीबरोबर समाजाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. आयुष्यात जो मागे वळून बघतो तो जीवनात यशस्वी होतो.
आजच्या प्रगत तंत्रज्ञान व सोशल मिडीया यावर बोलताना ते म्हणाले, आजच्या काळात तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. इंटरनेटमळे जग खूप जवळ आले आहे. घरबसल्या तुम्हाला जगाची कोणतीही माहिती उपलब्ध होते. सोशल मिडीयामध्ये आलेली माहिती न वाचता पुढे पाठवली जाते ती तपासून पाहिली जात नाही ही चिंतेची बाब आहे. मिळालेली माहिती जशीच्या तशी खरी समजू नका. त्यासाठी तुमच्या बुद्धीची कसोटी लावा. तपासून बघा. चिकित्सा करा व समाजाला निर्दोष माहिती पोहोचवण्याची दक्षता घ्या. जीवनात एखाद्या अपयशाने खचून जावू नका. आवड-निवड, छंद यामध्ये व्यवसाय, नोकरी निवडा. निसर्गाने भरभरून दिले आहे. अनेक मार्गातून एखादा मार्ग यशाची किरणे घेऊन येईल व आपण आनंदी व यशस्वी व्हाल, असा मौलिक यशाचा मूलमंत्रही त्यांनी यावेळी विद्यार्थ्याना दिला.
या समारंभाचे अध्यक्ष प्रदीप कबाडे म्हणाले, पदवीनंतर तुमच्या जीवनाचा प्रवास वेगळ्या पद्धतीने सुरू होतो. त्यात भविष्याची वाटचाल व जबाबदारी असते. यावेळी आई-वडील, शिक्षक यांचे आवरण नसते. तुम्हाला तुमच्या पायावर सक्षम उभे राहावे लागेल व जीवनाचा यशस्वी मार्ग शोधावा लागेल.
या समारंभाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथी परिचय प्राचार्या डॉ.प्रज्ञा पाटील यांनी करून दिला. यामध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शुभारंभाच्या पदवीदान कार्यक्रमाची आठवण विद्यार्थ्यांना करून दिली. या पदवीदान समारंभात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. संस्थेचे सीईओ प्रदीप कबाडे यांनी मान्यवरांचे बुके देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रणिता अरगडे व लोखंडे यांनी केले. तर प्राचार्य विजयानंद आरलेलीमठ यांनी उपस्थित मान्यवर विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे आभार मानले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |