सातारा : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर अनेक नाट्यमय घडामोडी देशवासीयांना पहावयास मिळाल्या. यातून सावरतो न सावरतो तोच लोकांच्या जिवनाशी संबंधित असलेला पेट्रोल व डिझेलच्या किंमती परवापासून अचानक वाढल्यामुळे सातारकर मात्र भांबावलेले आहेत. अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
2014 साली केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘अच्छे दिन’ येणार आहेत, असा शब्द दिला होता. लोकसभा निवडणुकांच्या अगोदर भाजपाने इंधनांच्या किंमती कमी केल्या जातील, असा शब्द दिला होता. याबाबत अनेक जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या होत्या. गेली दहा वर्षे कॉग्रेसला कंटाळलेल्या लोकांनी मोठ्या विश्वासाने भाजपच्या हातात एकहाती सत्ता दिली. मात्र सत्तांतर झाल्यानंतर नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे इंधन दरवाढ कमी करण्यात आल्या. त्यामुळे साहजिकच मोदी जनतेच्या गळ्यातील ताईत बनले. मात्र, काही दिवसांतच पुढे पाठ, मागे सपाट प्रमाणे पुन्हा एकदा डिझेल व पेट्रोलच्या किंमती वाढल्या गेल्या. शेजारच्या पाकिस्तान, नेपाळ, चीन, श्रीलंका या देशांमध्ये पेट्रोल व डिझेलचे भाव स्वस्त व स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चे तेल (क्रूड ऑयल)चे भाव घसरल्यानंतरही आपल्याकडे पेट्रोल व डिझेलचे दर घसरत नाहीत. त्यामुळे यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराचा गॅस हे लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षापासून सातत्याने या तीनही गोष्टींची दरवाढ होत आहे. कुंपणच शेत खात असल्यामुळे याबाबतची तक्रार करायची कोणाकडे? हा प्रश्न सामान्य लोकांना सतावत आहे.
2017 मध्ये डिझेलचा 60.67 रुपये होता, मात्र एका वर्षातच हा दर 72.15 रुपये झाला. एका वर्षात सुमारे 13 रुपयांची दरवाढ केंद्र शासनाने डिझेलमध्ये केली आहे. तिच परिस्थिती पेट्रोलची आहे. 1 जून 2017 रोजी पेट्रोलचा दर 77.66 रुपये होता. तोच दर आज दि. 23 मे रोजी 85.05 असा झाला आहे. म्हणजेच एका वर्षात 7.46 पैशांनी पेट्रोल महागलेले आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव एकाच वर्षात गगनाला भिडले आहेत. गर्भश्रीमंत व नोकरदार वर्गाला या भाववाढीचा फटका बसला नसला तरी ज्या लोकांची हातावरची पोटे आहेत, ज्यांना काम केल्याशिवाय संध्याकाळी दोन घास मिळत नाहीत, अशा लोकांवर मात्र संक्रांत आली आहे.
सातारा जिल्ह्यात नोकरदार, कष्टकरी व शेतकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. ट्रॅक्टर, दुचाकी, तीन चाकी, चारचाकी या वाहनांना पेट्रोल व डिझेलशिवाय दुसर्या कोणत्याही इंधनाचा पर्याय उपलब्ध नाही. असे असताना गेल्या तीन वर्षामध्ये सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात भाववाढ होत असल्याने सातार्यात केंद्र सरकारच्या विरोधात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या उन्हाळा आहे. चारचाकी गाड्यांमध्ये वातानुकूलित यंत्रणा (एसी) चालू केल्याशिवाय माणूस गाडीत बसू शकत नाही. एसी चालू असल्यामुळे गाडीमध्ये डिझेल व पेट्रोलचा वापर जास्त होत असतो. शेतकरी वर्गाला शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टर व ट्रॉलीची गरज असते. सध्या जिल्ह्यामध्ये रस्त्याची व ग्रेड सेपरेटरची कामे सुरु आहेत. सध्या सातारा शहरातील पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. त्यामुळे सातारकरांना संपूर्ण सातारा पालथा घालावा लागत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल व पेट्रोलचा अपव्यय होत आहे. त्यात डिझेल व पेट्रोलची दरवाढ झाल्यामुळे लोकांना डोक्यावर हात मारुन घेण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |