11:40pm | Mar 17, 2019 |
सातारा : 'श्रीमंतांना इमल्यांवर इमले चढवून त्यांची श्रीमंती दाखवून देवू दे. मात्र, आपली श्रीमंती झाडे आणि पर्यावरण आहे. ते इमले वाढवतील, चढवतील. आपण झाडे लावू आणि ती वाढवू. एक इमारत तुमच्या दोनच पिढ्यांसाठी पुरेल मात्र, आपण लावलेले एक झाड सहा ते सात पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल. आपली श्रीमंती हीच असणार आहे,' असे प्रतिपादन प्रख्यात चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी काटेसावर महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
सयाजी शिंदे यांनी साताऱ्यातील तीसहून अधिक स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सहकार्याने 'एक मूल... एक काटेसावर..!' ही अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून रविवार, दि. १७ रोजी सातारा शहरालगत असणाऱ्या यवतेश्वर येथे काटेसावर महोत्सवाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप त्याचबरोबर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यावरणप्रेणी, वृक्षप्रेमी आले होते.
महोत्सवास सुरुवात होण्यापूर्वी टाळ मृदंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. सातारा तसेच आजूबाजूच्या परिसरातील काही शाळांमधील विदद्यार्थीही यामध्ये सहभागी होते. त्यांनी काटेसावरची चित्रे रेखाटली होती. त्याचीही पाहणी प्रमुख उपस्थितांनी केली. यानंतर यवतेश्वर येथील एका हॉलमध्ये काटेसावर महोत्सवमागील संकल्पना प्रमुख उपस्थितांनी विषद करत देशी झाडांची पर्यावरण रक्षणात किती मोठी गरज आहे, याची मांडणी करण्यात आली. यावेळी कोल्हापूरातील सुहास वायगंणकर, डॉ. कैलास खडतरे, विजयकुमार निंबाळकर, सागर गायकवाड, रघुनाथ ढोले, डॉ. श्रीकांत शहा, राजेंद्र माने, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. भाग्यश्री शिंदे, अभय फडतरे, ॲड. धीरज घाडगे, सागर कटारिया, यवतेश्वरच्या सरपंच जाधव आदी उपस्थित होते.
सयाजी शिंदे म्हणाले, 'झाडे लावा आणि ती जगवा कारण तीच आपली श्रीमंती आहे. कोण काय म्हणते आणि कोण काय करते, याकडे लक्ष देवू नका. समाजातनेमका आणि अचूक विचार करणारी माणसे फार कमी आहेत. त्यामुळे आपल्याबरोबर जेवढे आहेत त्यांना बरोबर घेवून सर्वांनी मिळून काम करुयात. साताऱ्यातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सहकार्याने काटेसावर महोत्सवाला आपण साताऱ्यातून सुरुवात करत आहे. तो आपल्याला पर्यावरण रक्षणासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.'
अरविंद जगताप म्हणाले, 'सातारा जिल्हा छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जातो. ही ओळख कायमच राहणार आहे. मात्र, यापुढील काळात तो काटेसावरीचा जिल्हा म्हणूनही अधोरेखित व्हावा.'
सुहास वायंगणकर म्हणाले, 'जगभरातील जैवविविधता वेगाने नष्ट होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. जंगलांचे जतन करावे लागेल. देशी झाडे लावून त्याचे महत्त्व लोकांना पटवून दिले पाहिले कारण ती आता आपल्या सर्वांसाठी काळाची गरज आहे.'
यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या छायाचित्रकार सीमा स्वामी, किशोर ठाकूर, धुमाळ यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांबरवाडी आणि यवतेश्वर ग्रामस्थ उपस्थित होते. सरस्वती हायस्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
हवा, फळे देणाऱ्या झाडांसमोर नतमस्तक व्हा..!
प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने अतिशय चांगली भूमिका मांडली. ते म्हणाले, 'सातारची ओळख सातासमुद्रापलीकडे आहे. येथे चांगले तत्काळ रुजते. सातारा देशातील असे पहिले गाव आहे की तेथे काटेसावर महोत्सव होत आहे. हा उत्सव आपण महाराष्ट्रभर नेऊ. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या झाडांचा उत्सव करू. काटेसावरचे पर्यावरणातील महत्त्व किती मोठे आहे हे आपण आता ओळखले पाहिजे. एक झाड आपल्या सात ते आठ पिढ्यांना पुरणारे आहे. त्यामुळे झाडे लावूनच उत्तर द्यावे लागणार आहे. हवा, फळे, फुले देणाऱ्या झाडांसमोर नतमस्तक होणे काळाची गरज आहे. आपण प्रत्येकांनी डोंगर हिरवागार करण्याचे स्वप्न पाहू. मला माहित आहेत आता निवडणुका आहेत. त्यामुळे पैशांचा महापूर येणार आहे. उमेदवारांकडून जेवढे पैसे दारू आणि मतांसाठी खर्च होणार आहेत तेवढेच पैसे जर पर्यावरण रक्षणासाठी खर्च झाले तर प्रत्येक माणूस सुखी होणार आहे.'
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |