03:28am | Jan 09, 2019 |
खंडाळा : भाजप सरकारने नुसती घोषणाबाजी सुरु ठेवली आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी हे सरकार करत नाही. धनगर आरक्षणाचे जे झालेच तेच पत्रकार संरक्षण कायद्याचे झाले. आम्ही त्यांच्यासारखे नाही. आम्ही शरद पवारांचे कार्यकर्ते आहोत. दिलेला शब्द पाळणारच. सत्तेवर आल्यानंतर पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसह माध्यमांचे सर्व प्रश्न मार्गी लावू. पत्रकार संरक्षण हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जाहीरनाम्याचा भाग असेल, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली.
खंडाळा पंचायत समितीच्या किसनवीर सभागृहात पत्रकार दिन आणि जिल्हास्तरीय आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे होते. यावेळी आ. मकरंद पाटील, भाजपनेते पुरुषोत्तम जाधव, महाराष्ट्र केसरी बाला रफीक यांच्यासह सर्वच राजकीय पक्षातील मान्यवरांची उपस्थिती होती.
राजाराम मोहनरॉय, बाळशास्त्री जांभेकर यांच्यासह देश-विदेशातील महनीय पत्रकारांचे दाखले देत आ. जयंत पाटील म्हणाले, देशात आणि राज्यात सध्या पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे. आपल्याला हवं ते छापून आलं नाही तर पत्रकारांची मुस्कटदाबी केली जात आहे. आमच्या काळात आमच्याविरोधात जरी छापून आलं तरी आम्ही पत्रकारांविरोधात कोणतीही कृती केली नाही. आता मात्र असे पत्रकार भीतीच्या छायेखाली आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्यातील पत्रकारितेला क्रांतीचा वारसा आहे. त्यामुळे या अघोषित आणीबाणीविरोधात याच जिल्ह्यातून उठाव होवू शकतो.
पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात अध्यक्ष हरीष पाटणे यांनी माझ्याजवळ सातत्याने पाठपुरावा केला आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या पाटण येथील राज्यस्तरीय अधिवेशनात मला बोलावले होते. तेव्हाही सत्ता आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावू, असा शब्द आम्ही दिला आहे. आम्ही आमच्या शब्दापासून दूर जाणार नाही. तुम्ही पाठपुरावा करायला कमी पडू नका.
आ. मकरंद पाटील म्हणाले, खंडाळा तालुका पत्रकार संघाचे कार्य सर्वात उजवे आहे. पिढ्यान् पिढ्या दुष्काळी कलंक असलेला हा तालुका आता दुष्काळातून बाहेर आला आहे. पाणी आणि औद्योगिकरणाच्या वाटचालीत खंडाळ्याच्या पत्रकारितेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला नेहमीच इथल्या पत्रकारितेचा अभिमान वाटत आला आहे.
हरीष पाटणे म्हणाले, पत्रकार संरक्षण कायदा झाला मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही, ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शनची घोषणा झाली मात्र अंमलबजावण दिसत नाही. ग्रामीण भागातील पत्रकारांना सरसकट ऍक्रीडेशन दिले जात नाही. सरकार फक्त घोषणा करत आहे. आ. जयंत पाटील यांनीही शब्द दिला आहे. सत्तेवर आल्यावर त्यांनी तो शब्द पाळावा अन्यथा त्यांनाही रोषाला सामोरे जावे लागेल. सातारा जिल्हा पत्रकार संघाने नेहमीच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले. अन्यायाच्याविरोधात जिल्हा पत्रकार संघ नेहमीच रस्त्यावर उतरला आहे. कुठलीही राजकीय अथवा प्रशासकीय सत्ता न पाहता सामान्यांना न्याय देण्यासाठी ग्रामीण पत्रकारांनी आक्रमकपणे लेखणी चालवावी, असे आवाहनही पाटणे यांनी केले. यावेळी पुरुषोत्तम जाधव यांंनी पत्रकार संघाच्या उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी महाबळेश्वरचे सचिन शिर्के यांना आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर महाराष्ट्र केसरी बाला रफीक, यशवंत सातारा संघाचे पुरुषोत्तम जाधव, मोहन खोपडे, बाबा लिमण, नवनाथ ढमाळ, मंगेश क्षीरसागर, एव्हरेस्ट वीर प्राजित परदेशी, जलतरणपटू सूर्यकांत भांडे- पाटील, शेतीनिष्ठ शेतकरी जालिंदर पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.
स्वागत संतोष पवार, शशिकांत जाधव यांनी केले. प्रास्तविक रमेश धायगुडे यांनी केले. संजय भरगुडे यांनी आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादीचे कॉंग्रेस सातारा लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष ऍड. नितीन भोसले, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र तांबे, उदय कबुले, दिपाली साळुंखे, मकरंद मोटे, वंदना धायगुडे, अश्विनी पवार, चंद्रकांत यादव, अजय भोसले, विनोद क्षीरसागर, रामदास कांबळे, डॉ. नितीन सावंत, विवेक जाधव, दीपा बापट, एस. वाय. पवार, वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
हरीष पाटणे यांच्या बंडखोर पत्रकारितेचा मला जवळून अनुभव !
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात सातारा जिल्ह्यातील पत्रकारितेत क्रांती करण्याची धमक असल्याचे गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, हरीष पाटणे यांच्याशी माझी अनेकदा भेट झाली. त्यांच्या पत्रकारितेत बंडखोरी आहे. बंडखोरी ही पत्रकारांमध्ये असलीच पाहिजे त्याशिवाय तो खरा पत्रकार नसतो. तो बंडखोरपणा मी हरीष पाटणे यांच्याकडे खूप जवळून पाहिला आहे. चुकीच्या कामाच्या विरोधात बोलण्याचं धाडस म्हणजे बंडखोरी असते. आम्ही उद्या सत्तेवर आल्यानंतर आम्ही त्यांनी मांडलेल्या मागण्या मान्यच करणार आहोत. मात्र तरीही आमच्याकडून चूक झाली तर त्यांनी त्यांची बंडखोरी कायम ठेवावी. राज्यकर्त्यांनी चांगलं केलं तर त्याचं जरुर कौतुक करा मात्र राज्यकर्ते चुकीचे वागले तर त्याच्यावर टीका झाली पाहिजे, अशी अपेक्षाही आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |