02:27am | Apr 07, 2019 |
सातारा : सातार्यातील तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे रस्त्यालगत स्वत:च्या उपजिवीकेसाठी महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, वेश्यागमण करण्यासाठी रिक्षातून नेल्याप्रकरणी तीन रिक्षा चालकांवरही गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
प्रकाश गोकूळदास शिंदे (वय 40, मल्हार पेठ), उत्कर्ष शंकर दिवाण (वय 41, रा.सदरबझार), संभाजी संपत चव्हाण (वय 47, रा.अंबेदरे रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ज्या महिलेवर गुन्हा दाखल आहे त्या महिलेला पोलिसांनी अद्याप ताब्यात घेतलेले नाही. याप्रकरणी महिला पोलिस प्रियांका बांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवार दि. 5 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास सातारा उपविभागीय पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस स्टँड ते पोवई नाका रस्त्यावरील आडोशास गैरप्रकार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी एक पथक तयार करुन घटनास्थळी छापा टाकला असता तेथे तीन पुरुष, तीन महिला संशयास्पदरीत्या आढळून आले. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले. संबंधित महिला वेश्यागमणासाठी तयार झाल्यानंतर त्यांनी ठरलेल्या रिक्षा चालकांना बोलावले. यावेळी पोलिसांनी रंगेहाथ कारवाई करत संबंधित तीन महिलांना ताब्यात घेतले. रिक्षा चालकांकडे चौकशी केल्यानंतर रिक्षा चालकांशी आपआपसात संगनमत करुन उपजिवीकेसाठी हे कृत्य करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन रिक्षा चालकांना ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देवून तीन रिक्षा चालकांसह एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, जबरदस्तीने वेश्यागमण करणार्या तीन महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोनि प्रदीपकुमार जाधव करत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |