03:03am | Jan 30, 2019 |
सातारा : सुवर्णकार म्हणून पारंपारिक व्यवसाय करताना सुवर्णकार समाजातील युवकांनी स्वतःला काळाच्या बरोबर नेले पाहिजे. सुवर्णकारांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या प्रशिक्षण योजना तसेच कर्ज योजना उपलब्ध असून त्याचा फायदा घेवून युवकांनी घेवून स्वबळावर व्यवसायात उभे राहिले पाहिजे. सुवर्ण व्यवसायात भांडवलदारांचे आगमनामुळे सुवर्णकार व्यावसायिक अडचणीत आले आहे. मात्र, प्रशिक्षणातून कार्यकुशल होवून या व्यवसायात उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन युवानेते सुधीर सागवेकर यांनी केले.
येथील विश्वकर्मा पांचाळ सुवर्णकार समाज संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सागवेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सागर सागवेकर होते. यावेळी व्यासपीठावर सुवर्णकार समाजाचे नेते मुरलीधर बोरसुतकर, सुरेश धोंडीराम पोतदार, प्रकाश सडकर, गणेश पाचेरकर, अजय पालकर, सौ. नीता नगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुधीर सागवेकर पुढे म्हणाले, सोनार समाजातील व्यवसायिकांना बँकींग अपरेझर आणि व्हेलवेशन शासकीय प्रशिक्षण कार्यक्रमांमधून प्रमाणपत्र मिळवून बॅकांमध्ये अपरेझर आणि व्हेलवेशन म्हणून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच सोनार कामाविषयी शासकीय प्रशिक्षणास सहभागी झाल्यास त्यांना प्रशिक्षण यशस्वी केल्यानंतर विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याची संधी आहे. त्यामुळे युवकांनी याबाबत संबंधित यंत्रणांशी संपर्क साधला पाहिजे. याबरोबरच सोनार ओळखपत्र म्हणून परिचय कार्ड व हस्तशिल्प कार्ड मिळते त्याचा उपयोग करुन शासकीय कौटुंबिक मेडिकल सुविधांचाही लाभ घेता येतो.
सुवर्णकार समाज संख्येने अल्प असून तो आपापल्या कामात व्यस्त असतो. सुवर्णकार युवकांना मार्गदर्शनाची गरज असून समाजातील नेत्यांनी युवकांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना उभे करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. संघटनेत मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित राहण्याची गरज असून त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी सागर सागवेकर यांनी केले.
यावेळी गणेश पाचेरकर, मुरलीधर बोरसुतकर आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सातारा, सांगली, पुणे, मुंबई येथील समाजबांधव, महिला, युवक, युवती उपस्थित होत्या. प्रीतम पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. सचिन पंडीत यांनी प्रास्ताविक केले. किशोर पोतदार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्णकार समाज संस्थेच्या सर्व पदाधिकाऱयांनी परिश्रम घेतले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |