सातारा : वाढे (ता.सातारा) गावच्या हद्दीत रविवारी रात्री अज्ञात वाहनाने ठोकरल्याने झालेल्या अपघातात वीरभद्र हलगडगी (वय 65, रा. संकेश्ववर, बेळगाव) हे जागीच ठार झाले. ते कंपनीमध्ये कर्मचारी असून कंपनीच्या कामानिमित्त जात असताना जेवणानंतर चालताना अज्ञात वाहनाची त्यांना धडक बसल्याचे समोर आले आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, वीरभद्र यांना त्यांच्य कंपनीच्यावतीने रविवारी 30 ते 35 जणांना यवत (पुणे) येथे एका टुरसाठी बसमधून पाठवण्यात आले होते. त्याठिकाणचे काम संपल्यानंतर ते सर्वजण पुन्हा संकेश्वरकडे निघाले होते. सातार्यातील वाढेफाटा ओलांडून बाँबे रेस्टॉरंट पुलाजवळ आल्यानंतर ते सर्वजण एका हॉटेलमध्ये रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जेवण्यासाठी थांबले. जेवण झाल्यानंतर हलगडगी हे एकटेच परिसरात असणार्या रस्त्यावरुन चालण्यासाठी गेले.
यादरम्यान त्यांना अज्ञात वाहनाने ठोकरले. यामध्ये हलगडगी हे गंभीर जखमी झाले होते. रस्त्यावर अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याठिकाणी मोठी गर्दी जमली. याच दरम्यान संकेश्वर येथून हलगडगी यांच्यासोबत असणारे काही जण अपघातस्थळी गेले. अपघातात जखमी झालेले हलगडगी हे असल्याचे त्यांनी ओळखले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी जखमी हलगडगी यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.
याची तक्रार संतोष विष्णू डोंबे (रा. धारवाड) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञातचालकावर गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सहाय्यक निरीक्षक के.एस.शाळीग्राम हे करत आहेत.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |