07:15pm | Dec 30, 2018 |
सातारा : सातारा शहरामध्ये गेली अकरा वर्षे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काम करणारा माहेश्वरी चॅरिटेबल फौंडेशन ट्रस्ट समाजातील वंचितासाठी अनमोल असे मदत कार्य करत आहे. या ट्रस्टतर्फे गेली पाच वर्षे सातारा शहरातील आनंदाश्रम या वृध्दांचे संगोपन करणा-या संस्थेतील दोन वृध्दांना दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण खर्च हा ट्रस्टतर्फे करत आहेत. या वृध्दांसाठी आवश्यक वस्तू, धान्य, कपडे व जीवनाश्वयक वस्तूंचा दान कार्यक्रम नुकताच आनंदाश्रमात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुर्यवंशी, माहेश्वरी ट्रस्टचे माधव सारडा आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे श्री. सुर्यवंशी यांच्याहस्ते दत्तक आजी आजोबांसाठी वस्तूंची देणगी आनंदाश्रमाचे अध्यक्ष डॉ. शाम बडवे व दिलीप पाठक यांच्याकडे सूपूर्द करण्यात आली. यावेळी बोलताना श्री. सूर्यवंशी म्हणाले, माहेश्वरी चॅरिटेबल फौंडेशन करत असलेल्या कार्याचे कौतुक करताना आजच्या धावपळीच्या युगात आपला व्यवसाय, उद्योग सांभाळून समाजासाठी उपयुक्त व योग्य असे काम करणा-या सर्व पदाधिका-यांना धन्यवाद दिले. आज समाजाता स्वार्थीवृत्ती वाढत असताना माहेश्वरी ट्रस्टचे कार्यकर्ते समाजातील गरजू लोकांना स्वतःच्या खर्चाने अनेक प्रकारची मदत करत आहेत हे पाहून समाधान वाटले. यावेळी त्यांनी ट्रस्टला शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी माहेश्वरी ट्रस्टचे माधव सारडा यांनी ट्रस्टच्या गेल्या 11 वर्षातील कार्याचा आढावा घेतला. यामध्ये सातारा सिव्हील हॉस्पिटल येथे दररोज दुपारी 12 वाजता रुग्ण नातेवाईकांना जेवण, निराश्रीत लोकांना आधार देऊन पुर्नवसन करणे, थंडीमध्ये रात्री 12 वाजता रस्त्यावर उघडयावर झोपणा-या लोकांना ब्लँकेटचे वाटप, आनंदाश्रमातील वृध्दांना दत्तक घेऊन दैनंदिन वस्तूंची देणगी अशा कार्यक्रमांची माहिती सांगितली. तसेच प्रियजनांच्या वाढदिवसानिमित्त किंवा स्मृतीदिनानिमित्त सदर संस्थेला दुपारी एक वेळच्या जेवणाचे 3000 रुपये किंवा गोड जेवणाचे 3500 रुपये देऊन सदर अन्नछत्र सतत कार्यरत ठेवण्यास मदत करावी. त्यामुळे सातारा शहराच्या, जिल्हयातून येणा-या गोर-गरीब रुग्णांच्या नातेवाईकांची एक वेळची दुपारची भोजनाची चांगली व्यवस्था होत आहे. तसेच लांबवर राहणा-या आप्तेष्टांना आपल्या प्रियजनांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून वातानाकुलित शवपेटी उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा लाभ 3 वर्षात अनेकांनी घेतला आहे. यासाठी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी मदत करत असल्याचा आवर्जून उल्लेख केला.
डॉ. शाम बडवे यांनी आनंदाश्रमाची माहिती सांगितली. श्री. दिलीप पाठक यांनी प्रास्ताविक व आभार मानले. माहेश्वरी ट्रस्टतर्फे व आनंदाश्रमातर्फे श्री. सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. माहेश्वरी फौंडेशन ट्रस्टतर्फे आनंदाश्रमांच्या पदाधिका-यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आनंदाश्रमातील सर्व आजी आजोबा, डॉ. अरविंद काळे, माहेश्वरी फौंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष हरिनारायण कासट, सचिव दिलीप लोया, खजिनदार उज्वल सारडा, पदाधिकारी विनोद राठी, राधेशामजी भंडारी, प्रकाशजी मंडोरे, राजगोपाल चांडक, राजू कासट, मुकुंद लाहोटी, नरेंद्र मिणियार, प्रमोद लाहोटी, श्रीराम सारडा, जितेंद्र भंडारी, श्रीनिवासजी झंवर उपस्थित होते. तसेच सर्व माहेश्वरी महिलाही उपस्थित होत्या. माहेश्वरी ट्रस्टतर्फे सर्वांसाठी चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |