02:13am | Oct 13, 2019 |
कराड : डॉक्टर पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून आणि तिला घरातून बाहेर काढल्याची आणि पतीने बेकायदेशीरपणे दुसरे लग्न केल्याचा जाब विचारल्याने सासरच्या लोकांनी ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद डॉ. सौ. सोनाली माळी (मूळ रा. सैदापूर, ता. कराड, सध्या रा. इचलकरंजी, ता.हातकणंगले) यांनी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पतीने केलेल्या छळाची आणि बेकायदेशीरपणे केलेल्या दुसर्या लग्नाची कैफियत सौ. सोनाली माळी यांनी शुक्रवारी कराड येथे पत्रकार परिषदेत मांडली.
डॉ. सौ. सोनाली माळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी माझे पती जयंत आनंदराव माळी, मुलगा आरव (वय दोन वर्षे), सासरे आनंदराव माळी, सासू सौ. रंजना, नणंद जयश्री श्रीशैल माळी, त्यांचे पती श्रीशैल माळी आणि त्यांची दोन मुले, असे आम्ही एकत्रात कृष्णा कॅनॉल, सैदापूर येथे राहण्यास होतो. दि. 27 मे 2015 रोजी माझा जयंत माळी यांच्याशी विवाह झाला. पती डॉक्टर असल्याने लग्नात सासरच्या लोकांनी 5 लाख रूपये हुंडा मागितला. आई-वडीलांनी तो हुंडा दिला. त्यानंतर मी एमडी परिक्षा उत्तीर्ण झाले. जुलै 2015 मध्ये पतीने कासेगाव (ता. वाळवा) येथे ओपीडी सुरू केली. तेथे आम्ही दोघेही ओपीडी चालवित होतो. त्यानंतर पती व सासूने लग्नातील 18 तोळ्याचे दागिने माझ्याकडून घेतले. त्यानंतर चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. आई-वडीलांनी कर्ज काढून अल्टो कार घेऊन दिली. त्यानंतर एम. डी. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रूपये आणण्यासाठी तगादा लावला. पैसे आणण्यासाठी माझा छळ करू लागले. त्यानंतर आई-वडिलांनी ऍडमिशनसाठी 5 लाख रूपये दिले. तरीही सासरचे लोक उर्वरीत 10 लाख रूपयांसाठी शारीरिक, मानसिक त्रास देऊ लागले. एम. डी. च्या ऍडमिशनसाठी लागणारे दहा लाख रूपये दिल्याशिवाय मुलीला नांदायला नेणार नाही, अशी धमकी पतीने वडीलांना दिली.
यंदाच्या मे महिन्यात आपणास पतीच्या मोबाईलमध्ये एका मुलीचे फोटो आणि मेसेज दिसले. त्याबाबत विचारणा केली असता पती, सासू, नणंदेच्या पतीने मला मारहाण करून गाडीत घालून माहेरी नेऊन सोडले. विनंती करूनही मला सासरच्यांनी नांदायला नेले नाही. तसेच स्त्रीधन म्हणून माहेरच्या लोकांनी मला दिलेले 18 तोळ्यांचे दागिने मी परत मागितले तरी दिले नाहीत. त्यानंतर माझ्या पतीने बेकायदा दुसरे लग्न केले. याचा जाब विचारल्यानंतर पती, सासर्याने माझ्या वडीलांना धक्काबुक्की करून ठार करेन, अशी धमकी दिली. तसेच पतीने मला मारहाण केली. नणंद आणि सासूनेही मारहाण केली. घरातून आम्हाला बाहेर काढले. या प्रकरणी जयंत आनंदराव माळी, आनंदराव जगन्नाथ माळी, सौ. रंजना आनंदराव माळी, जयश्री श्रीशेल माळी, श्रीशेल माळी, विनायक आवळे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे डॉ. सौ. माळी यांनी सांगितले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |