11:28pm | Jun 19, 2019 |
कराड : लग्नाला चौदा वर्षे होवूनही मुल होत नसल्याच्या कारणावरून आणि चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या पोटावर, गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केल्याची घटना बनवडी (ता.कराड) येथे मंगळवारी रात्री घडली. प्रतिभा उर्फ जयश्री जालिंदर वाघमारे (वय 34), असे मृत महिलेचे नाव आहे.
दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर संशयीत जालिंदर उर्फ आबा प्रताप वाघमारे याने शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली पोलिसांकडे दिली. मृत प्रतिभाची मोठी बहिण राणी भंडारे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयीतास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हेळगाव (ता. कराड) येथील प्रतिभा उर्फ जयश्री हिचा सन 2005 मध्ये बनवडी (ता. कराड) येथील जालिंदर उर्फ आबा वाघमारे याच्याशी विवाह झाला होता. बनवडी येथील गावठाणात हनुमान मंदीराजवळ हे दाम्पत्य रहात होते. लग्नाला 14 वर्षे झाली तरी त्यांना अपत्य नव्हते. त्यामुळे जालिंदर उर्फ आबा याला नैराश्य आले होते. या कारणावरून तसेच पत्नी प्रतिभा हिच्या चारित्र्याचा संशय घेवून 2018 पासून जालिंदर हा दारू पिऊन पत्नीला सतत मारहाण, शिवीगाळ करत होता. त्यावरून दोघांत वारंवार भांडणे होत होती.
मे 2018 मध्ये आजारी असताना प्रतिभा माहेरी हेळगावला गेल्यानंतर तिने हा प्रकार मोठी बहिण राणी भंडारे हिला सांगितला होता. तिच्यावर औषधोपचार केल्यानंतर राणी यांनी तिची तसेच तिचा पती जालिंदर या दोघांची समजूत काढून प्रतिभाला सासरी बनवडी येथे पाठवले होते. तरी अधूनमधून दोघांमध्ये भांडणे होत होती. मंगळवारी (दि. 18) रोजी दुपारी चुलत्यांच्या घरात जालिंदर दारू पित बसला होता. यावेळी दिवसा दारू पिऊ नका, असे म्हणत प्रतिभा ही जालिंदरला उलट-सुलट बोलली. त्यामुळे चिडलेल्या जालिंदरने तिला घरात जावुन हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोघांत पुन्हा भांडण झाले.
त्यावेळीही जालिंदरने तिला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे ती जमिनीवर कोसळली. त्यानंतरही तूला जिवंत ठेवत नाही असे म्हणत जालिंदरने तिच्या पोटावर व गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तिच्या कपाळावर जखम होवून त्यामधून रक्तस्त्राव सुरू झाला. तिची हालचाल व श्वास थांबल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची जालिंदरची खात्री झाली. त्यानंतर तो तात्काळ शहर पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला आणि त्याने पोलिसांना घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
याप्रकरणी मृत प्रतिभा हिची मोठी बहिण राणी भंडारे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयीत जालिंदर उर्फ आबा वाघमारे यास पत्नीच्या खूनप्रकरणी अटक केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मंगळवारी रात्री स्थानिक नागरिकांनी हनुमान मंदीर परिसरात गर्दी केली होती. शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर प्रतिभाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देवून पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक मछले तपास करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |