05:54pm | Oct 07, 2018 |
सातारा : अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या पहिल्या चार कवितासंग्रहानंतर कवी संदीप खरे ह्यांचा ‘मी आणि माझा आवाज...’ हा नवा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. कधी मिश्किल, कधी गंभीर, कधी आत्मचिंतनपर तर कधी आयुष्यातील अत्यंत जवळच्या नात्यांचा घेतलेला वेध अशा वैविध्यपूर्ण कवितांचा समावेश असलेल्या ‘मी आणि माझा आवाज...’ मधील कविता आणि इतर कविता सातारकरांच्या मनात घर करुन गेल्या. त्याचबरोबर संवादक विनोद कुलकर्णी यांनी कवी खरे यांच्याशी साधलेल्या संवादाने कवी खरे यांचा आतापर्यंतचा प्रवास सातारकरांसमोर उलगडला. कवी खरे यांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी सातारकरांनी तुडुंब गर्दी केली होती. एरवी कवितांचा कार्यक्रम असला की पाठक हॉलही भरत नाही अशी परिस्थिती साता-याने अनेकदा अनुभवली आहे. परंतु पहिल्यांदाच केवळ कवी खरे यांच्या कविता आणि त्यांची मुलाखत ऐकण्यासाठी शाहूकलामंदिर हाऊसफुल्ल झाले होते एवढेच नव्हे तर जागा न मिळाल्याने अनेकांनी उभे राहूनच कवी खरे यांच्या कवितांचा आस्वाद घेतला.
निमित्त होतं येथील शाहूकलामंदिर येथे झालेल्या सातारा जनता सहकारी बँक आणि मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने आयोजित ‘मी आणि माझा आवाज...’ या कार्यक्रमांचे. रसिक साहित्य प्रा.लि. आणि रसिक एन्टरटेनमेंटने कवी खरे यांचे ‘मी आणि माझा आवाज...’ हा कवितासंग्रह प्रकाशित केला असून पहिली आवृत्ती हातोहात संपली असून दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. त्या पाशर्वभूमीवर सातारकर रसिकांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कवी खरे यांनी सातारकर रसिक प्रगल्भतेचे भरभरुन कौतुक करत आतापर्यंत न ऐकवलेल्या कविता याठिकाणी सादर करणार असल्याचे सांगितले. संवादक विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच ‘पाऊसराव’ ही कविता सादर करुन उपस्थित रसिकांच्या ह्दयात स्थान मिळवले ही कविता सर्वांनाच पाऊस येण्यापूर्वी आणि पाऊस आल्यानंतर सर्वांची असलेल्या स्थितीची जाणीव करुन गेली. त्यानंतर कवितेचा प्रवास कसा सुरु झाला. अभियांत्रिकी पदवीधर असतानाही याकडे कसे वळलो. ‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रमाची निर्मिती, त्याला मिळालेले यश याबद्दलचे किस्से सांगितले. कविता सादर करत त्यांनी दररोजच्या प्रत्येकाच्या जीवनात घडणा-या गोष्टी आणि त्याकडे बघणा-यांचे वेगवेगळया वृत्तीचे किती दृष्टीकोन असतात हे उदाहरणासह सांगितले. कवितांचे विविध प्रकार समाजात मानले जात असले तरी तसे नसून प्रत्येकाचा त्याकडे बघणारा दृष्टीकोन असतो. संवादक विनोद कुलकर्णी यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांतून कवी खरे यांच्या आतापर्यंत प्रवास सातारकरांसमोर उलगडत गेला. चांगली माणसे, चांगले प्रकाशक भेटत गेले. अस्सल मराठी भाषिकाला रसिकतेचे भान असून अजूनही शब्दांना मान असून मराठी माणूस हा शब्दावर प्रेम करणारा आहे. यावेळी त्यांनी ‘दिवस असे की कविता’ कशी सुचले हे सांगत रेकॉर्ड न झालेल्या या कवितेतील ओळी ही सातारकर रसिकांसमोर सादर केल्या. ‘बाथरुम सिंगर’, प्रेमकविता, शेरो शायरी, गझल सादर करत सातारकरांच्या टाळया आणि वाहवा मिळवली.
‘मी आणि माझा आवाज...’ कवितासंग्रहातील शीर्षक कवितेमधून एखाद्या गोष्टीकडे बदलत जाणारा कवीचा दृष्टीकोन कसा होतो ते समोर आले. हा कवितासंग्रह कोणत्या एका विषयावर, तत्वावर, विचारावर नसून आयुष्य जगताना आलेले अनुवभ, विचार, दृष्टीकोन याचे बदलत जाणारे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी सांगितले. या कवितासंग्रहातील ‘म्हतारपण’ आणि ‘सायकल’ ही कविता उपस्थित सर्वांनाच अंर्तमुख करुन गेली. यावेळी त्यांनी वाचन हे आवश्यक असून तरुण पिढीला बरेच पर्याय उपलब्ध असले तरी कविता या माध्यमाला पर्याय नाही. सोशल मिडियाबाबत तारतम्य बाळगणे आवश्यक असून त्याच्या आहारी जाऊ नये असा संदेश त्यांनी यावेळी दिला. तसेच पालकांनीही पाल्यांना पुस्तक वाचण्याची आवड लावावी तीच त्यांना दिलेली खरी संपत्ती असून पुस्तक हा एकमेव मित्र असा आहे की जो कायम सोबत राहतो असल्याचे सांगताच उपस्थितांनी टाळयांचा कडकडाट केला.
प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी जनता सहकारी बँकेचे चेअरमन अतुल जाधव यांच्याहस्ते कवी संदीप खरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले. यावेळी रोहन वाघमारे, गणेश घोरपडे, नितीन संकपाळ, अमर बेंद्रे यांचा विशेष सहकार्याबद्दल तर जनता सहकारी बँकेचे आर.एम. डांबे, जी.व्ही.बारटक्के, एम.पी.इंगवले, एन.एम. सुरले, यु.टी.पाटील, एच.ए.शेख यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल कवी खरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अॅड. चंद्रकांत बेबले तर आभार जनता सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी यांनी मानले. कार्यक्रमास जनता सहकारी बँकेचे संचालक डॉ. चेतना माजगावकर, जयेंद्र चव्हाण, आनंदराव कणसे, वजीर नदाफ, अजित साळुंखे, धीरज कासट, बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री. शास्त्री, किशोर बेडकिहाळ, डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, राजेश जोशी, मसाप, शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य, सभासद यांच्यासह साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रातील मान्यवर आणि सातारकर रसिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, मसाप शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, दि गुजराथी अर्बनचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |