शिरवळ : फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ ,महाराष्ट्र राज्य आणि सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विदयमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज चिंतन परिषदेचे शिरवळ ता.खंडाळा याठिकाणी रविवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मंगलमूर्ती कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे खंडाळा अध्यक्ष महादेव कांबळे यांनी दिली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज चिंतन परिषदेचे उदघाटन साहित्यिक,विचारवंत डॉ.रझिया पटेल यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाहीर संभाजी भगत ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे,सातारा जिल्हा परिषद कृषी सभापती मनोज पवार, जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले,खंडाळा पंचायत समिती सभापती मकरंद मोटे, खंडाळा पंचायत समिती सदस्य राजेंद्र तांबे, शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे , उपसरपंच दिलीप गुंजवटे ,पुणे फर्ग्युसन महाविद्यालय उपप्राचार्य प्रकाश पवार, राष्ट्रीय सेवा दल माजी कार्याध्यक्ष अँड.दिलावर खान, माजी सभापती गुरुदेव बरदाडे , मिरजे सरपंच वंदना कडाळे,सामाजिक कार्यकर्ते अनिश खान , प्रा.सुरेश खराते , समता परिषद अध्यक्ष राजेंद्र नेवसे, फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.रोहिदास जाधव, रामोशी समाज संघ अध्यक्ष मल्हारी चव्हाण , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अनंतराव थोपटे महाविद्यालय प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख हे राहणार आहे.
यावेळी डॉ. रजिया पटेल यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अल्पसंख्याक या विषयावर, डॉ.तुकाराम रोंगटे यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी समाज या विषयावर तर साहित्यिक विचारवंत डॉ. शरद गायकवाड यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि मातंग समाज या विषयावर , साहित्यिक डॉ.कैलास सोनावणे यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि चर्मकार समाज या विषयावर , विचारवंत श्रावण देवरे यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि ओबीसी समाज या विषयावर , मुंबई विद्यापीठ संशोधक डॉ.नारायण भोसले यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भटके विमुक्त समाज या विषयावर व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी चिंतन परिषदेचा समारोप जेष्ठ विचारवंत प्रवीण गायकवाड यांचे भारतीय संविधान आणि सध्याची सामाजिक स्थिती या विषयाने होणार आहे. यावेळी नागरिकांनी परिषदेला उपस्थित राहावे असे आव्हान फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |