लोणंद : पाडेगाव ता. खंडाळा हद्दीत सकाळच्या वेळी निरा उजव्या कालव्यालगत गावठाणाच्या दक्षिणेकडील बाजूस एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडून परिसरात घबराट निर्माण झाली.
सदर घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करून मृत व्यक्तीचा छडा लावाण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लावली. तपासांती सदर मृत व्यक्ती हा पुणे येथील पादत्राणांचा व्यापारी चंदन शेवानी वय 45 असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे पुणे येथील लक्ष्मीरोडवर पादत्राणाचे दूकान आहे. प्राप्त माहितीनुसार लक्ष्मी रोड येथे शेवानी यांचे पादत्राणांचे दुकान आहे. शनिवारी दिवसभर ते दुकानात होते रात्री साडेदहा वाजल्यानंतर ते घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. येथील बंडगार्डन पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती बेपत्ता असल्याची फिर्याद नातेवाईकांनी पहाटेच्या सुमारास नोंदवल्याचे आढळून आले आहे. सदर व्यक्तीचा गोळ्या घालून खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. घटनास्थळाचा पंचनामा सपोनि संतोष चौधरी यांनी पंचासमक्ष करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेहा जवळ एक चिट्टी आढळली असून त्यातील मजकूराचा तपशील मात्र समजू शकला नाही. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेनुसार पोलीस पथके रवाना करण्यात आल्याचे वृत्त आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |