सातारा : अकोला येथे महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेमार्फत झालेल्या 6 व्या सब ज्युनियर (मुले) राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा संघातील खेळाडूंनी 2 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकुण 11 पदके मिळवून सांघिक विजेतेपद पटकावले. सातारा संघाने प्रथम क्रमांक पटकावून इतिहास घडवला असून सातारा संघाने पुन्हा एकदा राज्यात दबदबा निर्माण केला.
सातारा संघातील सोहम दिक्षित (शिवाजी उदय मंडळ) याने 33 ते 35 किलो वजन गटात तर, अभिवर्धन शर्मा (सातारा बॉक्सिंग अकॅडमी) याने 66 ते 70 किलो वजनगटात सुवर्ण पदक पटकावले. शिवाजी उदय मंडळाच्या वेदांत कांबळे (37 ते 40 किलो) याने रौप्यपदक तर, सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या यश साठे (40 ते 43 किलो), साईराज चव्हाण (49 ते 52 किलो), सुमित घाडगे (52 ते 55 किलो), शिवराज चोरगे (5 ते 58 किलो), साईराज पोतेकर (70 किलोवरील) यांनी रौप्यपदकाची कमाई केली. सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या अथर्व गोंजारी (35 ते 37 किलो) आणि अर्थव संकपाळ (64 ते 67 किलो) आणि शिवाजी उदय मंडळाच्या पार्थ शिंगटे (46 ते 49 किलो) यांनी कांस्य पदकाची कमाई केली.
सर्व खेळाडूंना आयबा मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष हरिष शेट्टी, रविंद्र होले, संतोष पवार, अमर मोकाशी, संतोष कदम, बापू पोतेकर, रावसाहेब संकपाळ, गोपाल राठोड, विनोद राठोड, राहूल तोरणे, मयुर डिगे, शैलेंद्र भोईटे, विश्वास मोरे, ऍड. श्रीधर जोशी, अंकुश माने, शिवाजी उदय मंडळाचे ऍड. अशोक शिंदे, सुरेश पाटील, रमेश शिंगटे, देवेंद्र बारटक्के, विशाल झोरे, अजय कांबळे, सचिन दिक्षित आदी मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |