सातारा : सातारा जिल्ह्यात कमी किंमतीमध्ये सोने विकणारी मध्यप्रदेशातील टोळी सक्रीय झाली असून या टोळीने सातारा जिल्ह्यात एकाला गंडा घातला असून याप्रकरणी गुन्हा नोंद झालेला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कमी किंमतीमध्ये सोने देतो, असा फोन आल्यास तत्काळ नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.
मध्यप्रदेशातील आमच्या गावामध्ये जुन्या बांधकामामध्ये दहा लाखाचे सोने सापडले असून ते कमी किंमतीत विकणार असल्याचे भासवून अनेक ग्राहकांना ही टोळी फोन करते. त्यामुळे या फसव्या जाळ्यामध्ये सोन्याच्या लोभापायी अनेकजण अडकतात. कमी किंमतीत सोन्याची भूरळ घालून ते गिर्हाईकाला सोने बघण्यासाठी निर्जनस्थळी बोलावून त्यांचा विश्वास पटविण्यासाठी खर्याखुरा सोन्याचा लहान तुकडा दाखवून ग्राहकाचा विश्वास संपादन करतात. विश्वास संपादन करुन त्यांना सोने विकण्यासाठी पैसे आणायला लावतात, पैसे घेवून ते ग्राहकांना सोने सदृश्य बनावट धातूचे तुकडे देऊन ग्राहकाची फसवणूक करतात. एखाद्या ग्राहकाच्या लक्षात ही फसवणूक आल्यानंतर ही टोळी त्यांना बेदम मारहाणही करते. असाच प्रकार दि. 12 रोजी उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला आहे.
याबाबत माहिती अशी की, विवेक अशोक येवले (रा. अंबवडे सं. ता. कोरेगाव) व त्यांच्या मित्रांकडून पाच लाख रुपये घेवून पिवळ्या रंगाच्या धातूचे बनावट सोने मध्यप्रदेशातील टोळीने त्यांना विकले होते. मात्र संशय आल्यानंतर येवले यांनी जाब विचारला असता टोळीतील लोकांनी विवेक येवलेंसह त्यांच्या मित्राला बेदम मारहाण केली होती. यामध्ये दोघेही जखमी झाले होते. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या टोळीतील एका संशयितास उंब्रज पोलिसांनी अटक केली आहे. कटनी, मध्यप्रदेशातील हे लोक सातार्यातील जंगली श्वापद, डुक्कर तसेच इतर प्राण्यांना मारुन त्यांच्या मांसाची विक्री करुन उदरनिर्वाह करतात. हे लोक डोंगरकपारीत टोळीने राहून छोट्या-छोट्या गावठी बॉम्बचा शिकारीसाठी वापर करीत असतात. मांस विक्रीच्या माध्यमातून स्थानिक लोकांशी ओळख व संपर्क वाढवून त्याच माध्यमातून बनावट सोने विक्रीचा त्यांनी नवीन फंडा शोधलेला आहे. त्यामुळे अशा लोकांपासून नागरिकांनी सतर्क राहून जर कोणाच्या संदर्भात असा प्रकार घडला तर त्यांनी त्वरित नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |