सातारा : सातारा शहर परिसरात अवैधरीत्या तब्बल अडीच किलो गांजा विक्रीसाठी घेवून फिरणार्या नाना महादेव मसुगडे (वय 50, रा.मिल्ट्री अपशिंगे ता.सातारा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. संशयिताने पंढरपूर येथून गांजा आणला असल्याची माहिती समोर आली असून या घटनेने सातार्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत एलसीबीने दिलेली माहिती अशी, रविवारी दुपारी एलसीबीचे पोलिस गस्त घालत होते. कोरेगाव रस्त्यावर पोलिस असताना त्यांना एमएच 11 सीएल 8975 या दुचाकीवर एजण संशयितरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता नाना मसुगडे असे सांगितले. पोलिस असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याला पकडून ठेवले. पोलिसांनी त्याच्याकडील पिशवी पाहिली असता त्यामध्ये गांजा होता.
एलसीबीच्या पथकाने संशयित नाना मसुगडे याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने पंढरपूर येथून गांजा आणला असल्याचे कबुली दिली. पोलिसांनी गांजा जप्त केला असता तो 2 किलो 400 ग्रॅम वजानाचा होता. याशिवाय दुचाकी व मोबाईल असा एकूण 33 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्न जर्हाड, पोलिस हवालदार सुरेंद्र पानसांडे, विजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, मोहसीन मोमीन, संजय जाधव यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |