02:35pm | Dec 21, 2018 |
सातारा : नेहरु युवा केंद्र सातारा (युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालय, भारत सरकार) आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी 7 दिवसीय जीवन कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. यावेळी सातारा डीवायएसपी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव यांनी वरील उद्गार काढले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजेंद्र यादव पुढे म्हणाले, पालकांनी तुम्हाला शाळेत विशिष्ट उद्देशाने घातलेले असून तुम्ही या वयात शैक्षणिक अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. वाचनाची आवड जोपासली पाहिजे तसेच चांगले संस्कारही आपल्या मनात रुजवले पाहिजेत. गुरुजनांचा व पालकांचा तसेच मोठ्या व्यक्तीचा आदर करणे, जीवनात शिस्तीला महत्त्व देणे, व्यसनापासून दूर राहणे, स्वच्छता बाळगणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे आदर्श विचार सर्वांनी आत्मसात केले पाहिजेत आणि त्याचे मनापासून पालनही केले पाहिजे.
प्रशिक्षण कालावधीतील सात दिवसांत तज्ञ साधन व्यक्ती यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, प्रा. भाई माने, प्रा. संपदा संकपाळ, डॉ. शाली जोसेफ, किशोर काळोखे, वनश्री हिरेमठ, डॉ. अभिजीत घोरपडे, पंकज दास, विजय जाधव यांनी मार्गदर्शन केले.
किशोर काळोखे यांनी मृद कौशल्याबाबत माहिती दिली. विजय जाधव यांनी व्यसनाधिनता आणि त्याचे दुष्परिणाम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना किशोर अवस्थेतील भावनिक बदल, आरोग्य व स्वच्छता, व्यसनमुक्ती, तणावमुक्तीसाठी उपाययोजना, समुहातील आपले वर्तन कसे असावे, संस्कार आणि मुल्यशिक्षण व विद्यार्थी जीवनातील चांगल्या सवयी अशा विविध विषयांवर समुह चर्चा करण्यात आली.
समारोप कार्यक्रमात भाई माने यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, अशा प्रकारचे प्रशिक्षण आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त असून जीवन कौशल्य प्रशिक्षण सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. प्रास्ताविक भानूदास यादव यांनी, उज्वला शितोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भावना काटकर, अक्षय माने, विजयकुमार विरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |