सातारा : खास मकरसंक्रांत सणानिमीत्त श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीय स्वयं. महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने सातारा शहरात खास करुन महिलांनी बनवलेल्या नाविण्यपुर्ण वस्तू, खाद्यपदार्थ आणि मालाच्या विक्रीसाठी दि. ९ ते १३ जानेवारी या कालावधीत पुष्कर मंगल कार्यालय येथे संक्रांत महोत्सव २०१९ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फेडरेशनच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी दिली आहे.
ग्राहकांना नाविण्यपुर्ण वस्तू आणि उच्चतम दर्जाचा माल एकाच छताखाली मिळावा तसेच चविष्ट आणि दर्जेदार खाद्यपदार्थांची चव चाखता यावी यासाठी सलग पाच दिवस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात महिला उद्योजक आणि गृहिणींनी बनवलेल्या सर्वप्रकारच्या दर्जेदार वस्तू, खाद्यपदार्थ आणि माल एकाच ठिकाणी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्यामुळे या खास प्रदर्शनाचा लाभ ग्राहकांनी घ्यावा आणि मकरसंक्रांतीचा आनंद वेगळ्यापध्दतीने साजरा करावा, असे आवाहन फेडरेशनच्या अध्यक्षा सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.
प्रदर्शनात सहभागी होणार्यासाठी इच्छुक महिलांनी स्टॉल बुकींगसाठी अजिंक्य बझार, यादोगोपाळ पेठ सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
१७ रोजी हळदीकुंकू समारंभ
दरम्यान, मकरसंक्रांतीनिमीत्त गुरुवार दि. 17 जानेवारी रोजी सुरुची बंगला येथे सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या उपस्थितीत महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी 5 ते 8 यावेळेत सर्व महिलांनी या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |