10:59pm | Nov 15, 2018 |
खंडाळा : महाराष्ट्रामध्ये भाजपचे सरकार येण्यास व सत्तांतर घडिवण्यास रिपाई कारणीभूत आहे. मागील लोकसभेमध्ये आरपीआयला जागा सोडून काय झाले याची माहिती संपूर्ण जिल्ह्याला आहे तरीही सत्तेमध्ये आल्यानंतर रिपाईला विशेषतः सातारा जिल्ह्याला सत्तेत वाटा देणे गरजेचे होते मात्र भाजप-शिवसेनेच्या दारात आल्यानंतरही गेल्या चार वर्षांपासून रिपाईला सत्तेपासून उपाशी ठेवले प्रशासनाच्या कोणत्याही विभागात रिपाईला जागा दिली नाही. त्यामुळे रिपाईच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
त्यामुळे रिपाईचा केवळ वापर करणाऱ्या भाजप -शिवसेनेने भविष्यात सत्तेपासून उपाशी राहण्याची तयारी ठेवावी.सत्ता नाही मिळाली तरी चालेल पण तुम्हालाही मिळू देणार नाही त्यासाठी आम्ही खंबीर आहोत. रिपाईची भूमिका महाराष्ट्रामध्ये काहीही असली तरी सातारा जिल्ह्यामध्ये भाजप-शिवसेनेबरोबर रिपाई सहभागी होणार नाही . त्याचप्रमाणे महायुतीच्या जागावाटपांमध्ये सातारच्या लोकसभेचा सात - बारा हा रिपाईचा असून याठिकाणी मागील निवडणुकीप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सातारामधून आगामी लोकसभा निवडणूक लढवावी संपूर्ण सातारा जिल्हा ताकदीनिशी उभा करू असे न झाल्यास महाराष्ट्रातील रिपाईच्या सर्व जिल्हाध्यक्षांना एकत्रित आणून भाजप-शिवसेनेच्याविरोधात महाराष्ट्रात वातावरण निर्माण करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे.
शिरवळ ता.खंडाळा याठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट )च्या नूतन शिरवळ कार्यकारिणी पदाधिकारी व नामफलक अनावरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष गौतम कांबळे ,शिवाजी अवघडे , माजी सरपंच सविता कदम ,महादेव कदम, रमेश कडाळे, प्रीतम गायकवाड ,अजित गायकवाड, विजय येवले, नामदेव कांबळे,राजीव मारुडा , आप्पा काकडे, आप्पा तुपे, हरीश काकडे,आदित्य काकडे, शुक्राचार्य भिसे, आदित्य गायकवाड, राजेंद्र जगताप,सुरेश येवले आदी उपस्थित होते.
अशोक गायकवाड म्हणाले , पक्षशिस्त मोडणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून नवीन कार्यकर्त्यांना रिपाईमध्ये संधी दिली जात असून आगामी काळात येत्या आठ दिवसात रिपाईची बरखास्त केलेली कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात येणार आहे. गाव तिथे शाखा हा उपक्रम हाती घेऊन निष्ठावान कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आगामी निवडणुकीमध्ये सर्व ताकदीनिशी उतरणार आहे. भारिप व एमआयएमच्या अभद्र युतीचा सातारा जिल्ह्यामध्ये कोणताही फरक पडणार नसून रिपाईचा कार्यकर्ता हा खंबीर आहे.
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिरवळ अध्यक्षपदी संदेश कांबळे, कार्याध्यक्षपदी रुपेश कांबळे, उपाध्यक्षपदी जाकीर खान, सचिवपदी सलमान काझी, सहसचिवपदी राजू बागवान, चिटणीसपदी अक्षय आठवले, सरचिटणीसपदी तुषार खरात यांची तर खजिनदारपदी सौरभ कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी गौतम कांबळे ,नामदेव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या हस्ते रिपाईच्या शिरवळ कार्यकारिणीची शाखेचे व नामफलकाचे उदघाटन करण्यात आले.
पक्षशिस्त मोडल्याने तालुकाध्यक्ष दादासाहेब कांबळे यांची पक्षातून हकालपट्टी
रिपाईला पक्षशिस्त आहे. मागील निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाची भूमिका भाजप-शिवसेनेबरोबर असताना पक्षशिस्त मोडल्याने रिपाईचे तालुकाध्यक्ष दादासाहेब कांबळे यांनी पक्षशिस्त मोडत पक्षाच्या भूमिकेला कडाडून विरोध करीत दुसऱ्याच्या वळचणीला पक्ष बांधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्या उमेदवारांना कमी मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे त्याचवेळेस पक्षशिस्त मोडल्याने रिपाईचे तालुकाध्यक्ष दादासाहेब कांबळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षशिस्त मोडणाऱ्या कार्यकर्त्यांना रिपाईमध्ये जागा नाही.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |