06:44pm | Jan 14, 2020 |
पुणे : ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरुन महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. असे असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या वादामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना ओढल्यामुळे कालपासूनच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेवून शिवसेना-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. जगात शिवरायांच्या बरोबरीचा कोणीच नाही, असे म्हणत जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज असे सांगत त्यांनी शरद पवारांचाही समाचार घेवून शिवसेनेनं त्याचे नाव बदलून ठाकरे सेना करावे, असा सल्लाही देण्यास ते विसरले नाहीत.
नरेश गोयल या शिवसेनेतून भाजपत गेलेल्या कार्यकर्त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन राज्यासह देशभरात गदारोळ झाला आहे. या पुस्तकाचा निषेध करण्याचे सोडून शिवसेनेचे वाचाळवीर खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवर तोफ डागत त्यांनी आता राजीनामे द्यायला हवेत, अशा प्रकारचे वक्तव्य करुन जखमेवरची ढपली काढण्याचा प्रयत्न केला होता. काल या संदर्भात राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती तसेच सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ते वादग्रस्त पुस्तक त्वरित थांबवावे तसेच ते पुस्तक लिहिणार्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत संजय राऊतांनी जपून भाषा वापरावी, असा इशाराही दिला होता. परंतू या सर्व प्रकरणात उदयनराजेंनी मौन धारण केले होते. शेवटी आज या संदर्भात उदयनराजेंनी आपले मौन सोडत पुणे येथील रेसिडेन्सी क्लब येथे पत्रकार परिषद घेवून सडेतोडपणे आपली भूमिका स्पष्ट करीत शिवसेनेसह राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले.
छत्रपती शिवाजी महाराजांची या जगात कोणीच बरोबरी करु शकत नाही. शिवाजी महाराज हे सर्व जनतेचे, रयतेचे राजे होते. त्यांच्याकडे जातीयवादाला थारा नव्हता. अशा या जाणत्या राजाची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांशी तुलना करणे अत्यंत चुकीचे आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का? असा प्रश्न उदयनराजेंनी यावेळी विचारला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विनाकारण उदयनराजेंसह छ. शिवाजी महाराजांच्या वंशजांना या प्रकरणात ओढल्यानंतर उदयनराजेंनी शिवसेना सुप्रिमो उद्धव ठाकरेंसह शरद पवारांवर जबरदस्त टीका केली. दांडपट्टा हातात नसताना ते फिरवणारे आहेत. त्यांचे नाव घेवून त्यांना मोठे करणार नाही. आता लोकशाही आहे. मात्र या लोकशाहीमध्ये ज्याने-त्याने आपली लायकी ओळखून घ्यावी. शिवसेना हा पक्ष काढताना त्यांनी आम्हाला विचारले होते का? शिव या नावाचे पावित्र्य न राखता शिव-वडा काढता. सरकार स्थापन करताना महाविकास आघाडीतून शिव का काढले? दादरला शिवसेना भवन उभारले. परंतू त्या शिवसेना भवनावर वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा व खालच्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा का? जेम्स लेन याने छ. शिवाजी महाराजांची बदनामी केल्यानंतर त्याचा निषेध करायला ही ठाकरेंची सेना कुठे गेली होती? असा प्रश्न यावेळी उदयनराजेंनी उपस्थित केला. जो-तो उठतो, स्वत:ला जाणता राजा संबोधून घेतो. अहो जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच होते. त्यानंतर जे लोक जाणता राजा म्हणवून घेतात, त्यांचा मी निषेध करतो, असा टोलाही उदयनराजेंनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला. शिवसेना या नावावर आम्ही वंशज असूनही कधी हरकत घेतली नाही, असे म्हणत बिनपट्ट्याच्या लोकांना त्यांची लायकी दाखवून देणार, असा जोरदार घणाघात उदयनराजेंनी संजय राऊतांचे नाव न घेता केला.
गेल्या जन्मात सर्वांपेक्षा मुंगीएवढे जास्त पुण्य केले, म्हणूनच माझा या घराण्यात जन्म झाला. आपण कधीही शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून त्याचा दुरुपयोग केला नाही, कधी मिरवले नाही. सत्तेच्या मागे कुत्र्यासारखं धावलो नाही, असे म्हणत उदयनराजेंनी त्यांच्यावर टीका करणार्यांना उत्तर दिलं. स्वार्थासाठी एकत्र येणारे जास्त वेळ एकत्र राहू शकत नाहीत. स्वार्थ साध्य झाला की ते आपापल्या मार्गाने निघून जातात. महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार करावा. जेव्हा लोक विचाराने एकत्र येतात, तेव्हा त्यांना तोडणे कठीण असते. अशी टीका उदयनराजेंनी महाविकास आघाडीवर केली. शिवाजी महाराज राहू द्या, तुमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार तरी आचरणात आणा, असा खोचक टोला त्यांनी लगावला. प्रबोधनकार ठाकरे यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचे चरित्र लिहिले. ते वेगळ्या विचारांच्या उंचीचे होते. परंतू तुमची उंची ती काय? तुम्ही तर भिवंडीसारख्या जातीय दंगली घडवल्या, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. जातीपातीत तेढ निर्माण करुन तुम्ही आतापर्यंत सत्ता काबिज केली आहे. पण हे फार काळ टिकत नाही, त्याचा हिशोब द्यावा लागतो, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच शिवस्मारक, आरक्षणासारखे प्रश्न जाणत्या राजा म्हणवून घेणार्याने प्रलंबित का ठेवले, असा सवालही यावेळी त्यांनी केला. सर्व जातीधर्मांना सामावून घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. हीच शिकवण आम्ही आतापर्यंत पाळत आलो आहोत. माझ्या बुद्धिला जे पटत नाही, ते मी करत नाही. त्यामुळेच निवडून आल्यानंतरही मी खासदारकी फुकून टाकली आहे. आता फक्त वन मॅन शो. माझं नातं सर्वसामान्य जनतेशी आहे, त्यांच्यासाठी मी जीव द्यायलाही तयार आहे. आम्ही काय करायचं हे इतरांनी सांगू नये, अशा शब्दांत उदयनराजेंनी शिवसेनेसह राष्ट्रवादी व महाविकास आघाडी सरकारचाही आपल्या खास शैलीत समाचार घेतला.
‘सातारा टुडे’च्या ‘त्या’ वृत्ताचा दाखला
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच उदयनराजेंनी आपल्या स्टाईलने राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आ. प्रकाश गजभिये यांचा समाचार घेतला. विधीमंडळ अधिवेशन सुरु असताना गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करुन विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर यांना मुजरा केला होता. करणाराला नाही, पण स्विकारणार्याला तरी लाज वाटली पाहिजे, असा दाखला देत राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. कोण तो गजभिये? त्याची लायकी तरी आहे का? असा दाखला देत ‘सातारा टुडे’च्या ‘लाज नाही वाटली? छत्रपतींचा मुजरा स्विकारताना? या वृत्ताचा दाखला त्यांनी यावेळी दिला.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |