11:26pm | Apr 01, 2020 |
पुसेगाव : येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ, मंडळाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख एक हजार रुपये देण्यात येत आहेत. या निधीसाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय संस्थेचे पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला असल्याचे या संस्थेचे सचिव डॉ.सुरेश जाधव यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्र शासन योग्य प्रकारे नियोजन करुन कोव्हीड-१९ या जागतिक महामारीचा सामना करत आहे. अशावेळी निर्माण झालेले आर्थिक संकट निवारण करण्यासाठी विविध संस्था तसेच दानशूर व्यक्ती पुढे येत असून ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे शिक्षक देखील नेहमीच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पुढे येतात. सामाजीक बांधीलकी जपत श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा एकमुखाने ठराव संस्थेच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे संस्था सचिव व राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले. यावेळी संस्था अध्यक्ष विश्वनाथराव जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व संस्था संचालक मोहनराव जाधव, योगेश देशमुख, हनुमानगिरी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्रीधर जाधव, पर्यवेक्षक दिलीप काळे, विविध शाखांचे मुख्याध्यापक दत्तात्रय गोफणे, अशोक वळवी, रविंद्र जाधव, शोभाराणी लाड उपस्थित होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |