12:10am | May 21, 2019 |
कराड : दारुच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात कुर्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना सोमवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास चोरे (ता. कराड) येथे घडली. दरम्यान, दारुसाठी पत्नीने पैसे न दिल्याच्या रागातून पतीने हे कृत्य केल्याचे माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. तसेच पोलीस संशयीतास ताब्यात घेण्यासाठी गेल्यानंतर त्याने विहिरीत उडी मारल्याने तो जखमी झाला आहे. सौ. शशिकला आनंदा सातपुते (वय 45, रा. बेघरवस्ती-चोरे, ता. कराड), असे खून झालेल्या महिलेचे आणि आनंदा दादू सातपुते (वय 50), असे संशयीताचे नाव आहे. या घटनेने उंब्रज, चोरे परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चोरे येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या मागासवर्गीय समाजाची बेघरवस्तीत सातपुते कुटुंब वास्तव्यास आहे. पती, पत्नी आणि दोन मुले, असे चौघेजण या कुटुंबात सदस्य आहेत. या कुटुंबातील आनंदा सातपुते यास दारुचे व्यसन असल्याने आनंदा सातपुते व पत्नी शशिकला यांच्यात सतत भांडणे होत होती. त्यांची दोन्ही मुले मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. मावस बहिणीचे लग्न असल्याने दोन्ही मुले मागील पंधरा दिवसांपुर्वी चोरे येथे आली आहेत. दारुच्या पैशावरुन पत्नी शशिकला यांच्यासह आनंदा सातपुते हा मुलांनाही शिवीगाळ, दमदाटी करत होता. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास संशयीत आनंदा सातपुते हा दारु पिऊन घरी आला व मुलगा व पत्नी सोबत भांडण केले. ही घटना शेजार्यांनीही पाहिली. त्यानंतर मुलगा आकाश हा लग्न साहित्याच्या खरेदीसाठी उंब्रजला गेला होता. या दरम्यान शशिकला सातपुते या घरातील हॉलमध्ये दुपारी झोपलेल्या असताना आनंदा सातपुते याने दारुच्या नशेत पत्नी शशिकला यांच्या मानेवर व डोक्यात कुर्हाडीचे घाव घातले. त्यात त्या जागीच ठार झाल्या. त्यानंतर संशयीताने दरवाजाला आतून कडी लावून पलायन केले. ग्रामस्थांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उसाच्या शेतातून पळून जाण्यात यशस्वी झाला.
घटनेची माहिती मिळताच उंब्रजचे पोलीस चोरे येथे दाखल झाले. त्यांनी संशयीताचा शोध घेऊन त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयीत आनंदा सातपुते याने विहरीत उडी मारल्याने तो जखमी झाला. त्यास उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक़ अजय गोरड यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत शशिकाला सातपुते यांचा मुलगा आकाश आनंदा सातपुते याने घटनेची फिर्याद दिली असून त्यावरून संशयीत आनंदा सातुपतेविरूध्द उंब्रज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |