कोरेगाव : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, तसेच युवा नेते महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक रमेश उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 2 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, युवा नेते महेश शिंदे यांच्या हस्ते ल्हासुर्णे येथे त्यांच्या मूळगावी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
रमेश उबाळे यांचा जन्म ल्हासुर्णे येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण या ठिकाणीच झाले. पुढे शिक्षण घेतच त्यांनी अतिशय लहान वयातच छोटे- छोटे व्यवसाय केले. व्यवसायातून पैसे मिळतात तसेच लोकसेवाही करता येते हे त्यांच्या लक्षात आले. पुन्हा त्यांना व्यवसायानिमित्त मध्यप्रदेश, गुजरात सारख्या राज्यात जाण्याचीही संधी मिळाली. या संधीचेही त्यांनी सोने केले. या ठिकाणी त्यांना व्यवसायात काय अडचणी येतात याचे बारीकसारीक अनुभव आले. या अनुभवांचा त्यांना फायदाही झाला. त्यांनी काही वर्षापूर्वी बालाजी कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी सातारा येथे सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात पारदर्शक व प्रामाणिकपणे काम केल्याने बालाजी कन्स्ट्रक्शनचा मोठा नावलौकिक झाला आहे. बांधकामासाठी आवश्यक असणारे केमिकलची कंपनीही सुरू केली. या कंपनीलाही त्यांनी बालाजी केमिकल्स असे नाव दिले आहे. उबाळे यांच्या हाताला यश असल्याने बालाजी केमिकल्स कंपनीही अल्पावधीत नावारूपास आली आहे. सुमारे एक वर्षापूर्वी त्यांची युवा नेते महेश शिंदे यांच्याशी ओळख झाली. याच दरम्यान महेश शिंदे यांचीही कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये बांधणी चालू होती. रमेश उबाळे यांच्याकडे असलेली समाजकार्याची आवड पाहून त्यांनी उबाळे यांच्यावर जिल्हा युवा मोर्चाच्या अनुसूचित जाती-जमाती संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी जातपात न पाहता वाडी वस्तीमध्ये जाऊन काम करून मागासवर्गीय समाजाबरोबर इतर समजाला भारतीय जनता पक्षाबरोबर जोडले. रमेश उबाळे यांचा स्वभाव नम्र, मनमिळाऊ असल्याने त्यांचा जिल्ह्यात मित्रपरिवार मोठा आहे. माणसं जोडणे व जोडलेला माणूस तुटू न देणे याची ते नेहमीच खबरदारी घेतात, त्यामुळे त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. समाजातले त्यांचे हे स्थान पाहून भारतीय जनता पक्षाने जिल्हा युवा मोर्चाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांना दिली आहे. या पदाच्या माध्यमातून पायाला भिंगरी बांधून ते काम करत आहेत.
वाढदिनी सकाळी 9 वाजता कोरेगाव येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून 9.30 वाजता कोरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून सकाळी 10 वाजता भाकरवाडीच्या अंधशाळेस सदिच्छा भेट व खाऊ वाटपाचा कार्यक्रम, 11 वाजता आशाग्राम वाघजाईवाडी (एकंबे) येथे सदिच्छा भेट व खाऊवाटपाचा कार्यक्रम, 12.30 वाजता मातोश्री वृद्धाश्रम येथे साहित्य वाटप, 2 वाजता एहसास मतिमंद मुलांची शाळा सातारा येथे आर्थिक मदत, 3.30 वाजता यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट सातारा येथे अनाथ व बेघर लोकांसाठी साहित्य वाटप, सायंकाळी 7 वाजता ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथे सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, कोरेगाव-खटाव विधानसभा मतदार संघाचे नेते महेश शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीपभाऊ शिंदे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष निलेश नलवडे, कोरेगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव, सातारा जिल्हा उपाध्यक्ष बबनराव कांबळे, कोरेगाव शहरअध्यक्ष राहुल बर्गे, युवा शहराध्यक्ष श्रीकांत बर्गे व सर्व पदाधिकारी ल्हासुर्णे यांच्या उपस्थितीत रमेश उबाळे यांचा जाहीर सत्कार तसेच जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ व ल्हासुर्णे ग्रामस्थांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार आहे. दरम्यान रमेश उबाळे याच ठिकाणी शुभेच्छा स्वीकारणार आहेत. यावेळी सस्नेह भोजन, सोबत सरगम दि फ्युजन बँड हा हिंदी, मराठी गाण्याचा, मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्व कार्यक्रमांना ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |