कराड : महाराष्ट्र शासन वित्त आणि नियोजन, वने, मंत्रालय यांनी 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार्या 33 कोटी वृक्षारोपन कार्यक्रमाच्या अनुषंगाने 1 जुलै, 2019 रोजी शुभारंभ गणेश कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर येथे हिम्मत खराडे, उपविभागीय अधिकारी, कराड, अमरदिप वाकडे, तहसिलदार, कराड, एम.एन.मोहिते, विभागीय वनअधिकारी, वन्यजीव, कराड, डॉ.अजित साजणे, वन परिक्षेत्र अधिकारी, कराड, मा. सौ. निलम येडगे, नगराध्यक्षा, मलकापूर नगरपरिषद, मा. सौ. विद्याताई थोरवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले की, मलकापूर नगरपरिषदेने सन 2010 सालापासून वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला असून, स्वच्छ, सुंदर व हरित मलकापूर अंतर्गत राजमंड्री, आंध्रप्रदेश येथून वृक्ष रोपे खरेदी करुन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम राबविला आहे व त्याचे यशस्वीरित्या संवर्धन केलेले आहे. मा. ना. सुधीर मुनगंठीवार, मंत्री, वित्त व वने, महाराष्ट्र राज्य यांनी पुणे येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकी दरम्यान दिलेल्या सुचनांनुसार अंमलबजावणी केली आहे. मलकापूर नगरपरिषदेने स्वतंत्र कृषि विभाग कार्यान्वीत ठेवला असून, या विभागामध्ये कृषि तज्ञांची नेमणूक करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड व संगोपन कार्यक्रम सुरु ठेवलेला आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे श्री. हिम्मत खराडे, उपविभागीय अधिकारी, कराड यांनी सांगितले की, मलकापूर नगरपरिषदेने विविध नाविण्यपुर्ण उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीरित्या राबविले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 24 बाय 7 नळ पाणीपुरवठा योजना याचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक योजना व अभियानामध्ये मलकापूर नगरपरिषद नेहमीच अग्रेसर राहत असलेने या योजना व अभियाने उत्तमरित्या राबविले जातात. आजसुद्धा वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले आहे. नगरपरिषदेने यापुढे वृक्षारोपण, पाणी बचत व प्लास्टिक मुक्त मलकापूर शहर यासाठी भरीव काम करावे.
कार्यक्रमाचे पाहुणे अमरदिप वाकडे यांनी नगरपरिषदेने हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतूक करुन आभार मानले. यावेळी वन विभागाचे एम.एन.मोहिते, वन अधिकारी, वन्यजीव कराड यांनी मार्गदर्शन केले की, महाराष्ट्र शासन वन विभाग व मलकापूर नगरपरिषद यांचे संयुक्तरित्या वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला जाईल. याकरिता नगरपरिषदेस सर्वोतोपरी सहकार्य करणेत येईल.
सदर कार्यक्रमास मलकापूर नगरपरिषदेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन शिक्षण व विकास समिती सभापती दत्ता पवार, महिला व बालकल्याण सभापती सौ.आनंदी शिंदे, उपसभापती सौ.कमल कुराडे, नगरसेवक श्री. प्रशांत चांदे, किशोर येडगे, अजित थोरात, आनंदराव सुतार, सागर जाधव, नगरसेविका सौ.पुजा चव्हाण, सौ.गितांजली पाटील, सौ.भारती पाटील, सौ. शकुंतला शिंगण, सौ. नंदा भोसले, सौ.अलका जगदाळे, सौ.स्वाती तुपे उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |