02:37pm | Oct 09, 2018 |
सातारा : ऑक्टोबर लोकराज्य विशेषांक परिवर्तनाच्या कथा सांगणारा , विशेषतः महिलाना प्रेरणा देणारा आहे. अशा कथा मधुनच परिवर्तनाचे बीज रोवले जाते. हा अंक उद्यमशील असलेल्या प्रत्येकाने वाचावा असाच आहे. त्यामुळे तो अधिकाधिक लोकांनी वाचावा, असे आवाहन साताऱ्याच्या जिल्ह्याधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.
माहिती व जनसंपर्क विभागाकडून ऑक्टोबरमध्ये काढण्यात आलेला महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा या लोकराज्य अंकाचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, नितीन थाडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात‘महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा’ या यशकथांवर आधारित विशेषांकाची निर्मिती करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे या विशेषांकाचे अतिथी संपादक असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींच्या जीवनावर विशेष लेख लिहिला आहे. या अंकात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या माहिती कार्यालयांद्वारे संशोधन करून लिहिण्यात आलेल्या यशकथा, उद्योजकता विकास, महिलांचे आर्थिक बळकटीकरण या विषयांवरील लेख, यशोगाथा व नावीन्यपूर्ण उपक्रम, विविध शासकीय योजना यांबाबत माहिती देण्यात आली आहे. यात सातारा जिल्ह्यातील भगिनीचीही यशकथा देण्यात आली आहे.
समाजातील विविध घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून, त्यांच्या जीवनमानातही बदल झाला आहे. अशा बदलांना टिपणारा लोकराज्यचा ऑक्टोबर महिन्याचा हा अंक आहे. या अंकात वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:च्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणाऱ्या राज्यातील विविध भागतील नागरिकांच्या यशकथांचा समावेश केला आहे. आर्थिक उन्न्तीचा मार्ग दाखवणाऱ्या या यशकथा इतरांसाठी प्ररेणादायी व उत्साह वाढणाऱ्या आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा या लोकराज्य अंक घेवून वाचला पाहिजे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी केले.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |