03:05pm | Nov 18, 2019 |
सातारा : सातारा शहर खड्ड्यात गेले आहे. रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात वाहतुकीचा घनशा घोळ कायम असतानाच शहरातील सदरबझार परिसरात असणार्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मात्र आरटीओ एजंटांच्या आशिर्वादाने सुरु असलेल्या दुकानदारीमुळे अजिंक्य हॉस्पिटल ते कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यायापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या पार्किंगमुळे या मार्गावर वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. असे असताना सातारा शहरात उचलाउचली करणारी वाहतूक शाखा मात्र याकडे ढुंकूनही पाहत नसल्याने आरटीओ एजंटांच्या फेकलेल्या तुकड्यांवर सातारा वाहतूक शाखाही लाभार्थी झाली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाहनचालकांना वाहतुकीचे नियम शिकविणार्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) समोरच गेल्या अनेक वर्षांपासून बोगस आरटीओ एजंटांनी उच्छाद मांडलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा या एजंटांनी अतिक्रमण करुन आपली दुकाने थाटली आहेत. आरटीओ कार्यालयाने यापूर्वीही आमचा आणि एजंटांचा काहीएक संबंध नाही, असे म्हणत घटस्फोट घेतला आहे. परंतू आरटीओ कार्यालयातील कामे एजंटांशिवाय होवूच शकत नाहीत, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. मात्र, आरटीओ एजंटांचे कार्यालयात फोफावलेले लोण आता सातार्यातील रस्त्यांवर पोहोचलेले आहे. अजिंक्य हॉस्पिटल ते कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यायापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा या एजंटांनी आपली दुकानदारी थाटलेली आहे. या एजंटांकडे येणारे अनेक ग्राहक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा, तसेच एखादा मस्तवाल ग्राहक रस्त्याच्या मधोमधही आपले वाहन पार्क करतो. या मार्गावर शालेय विद्यार्थी, चाकरमानी, तसेच ज्येष्ठ नागरिक प्रवास करीत असतात. इतकेच काय, तर जिल्हा पोलीस अधीक्षक ते इतर बडे अधिकारीही या मार्गाचा वापर करीत असतात. परंतू त्यांनाही शेवटी या रस्त्याची अवस्था पाहून वाट वाकडी करुन जावे लागते.
या रस्त्यावर असलेल्या पीयुसी सेंटर, झेरॉक्स तसेच परिवहन कार्यालयाशी संबंधित असणारी इतर दुकाने बेकायदेशीररित्या थाटली गेली आहेत. तसेच एजंटांकडून रस्त्याच्या मधोमध जाहिरात बोर्ड, स्टँडीज लावल्यामुळे हा रस्ता आहे की, आठवडी बाजार आहे, हेही ओळखणे मुश्किल झाले आहे. आरटीओ कार्यालयाकडून गेल्या काही महिन्यांपासून सम-विषम तारखेच्या पार्किंगचा बोर्ड लावण्यात येणार होता. परंतू हा बोर्ड अद्यापतरी या मार्गावर दिसत नाही. सातारा शहरात उचलाउचली करुन वाहनचालकांवर दहशत निर्माण करणारी सातारा शहर वाहतूक शाखाही या बजबजपुरीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे. आरटीओ कार्यालय वाहतूक शाखेच्या कार्यक्षेत्रात येत नाही काय? येत असेल तर या मार्गावरील बेशिस्त वाहन पार्किंग वाहतूक शाखेला दिसत नाही काय? की, सातारा शहर वाहतूक शाखा आरटीओ एजंटांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगत आहे काय? याचे उत्तरही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना द्यावे लागणार आहे. येत्या दोन दिवसांत आरटीओ कार्यालयाबाहेरील पार्किंगचा प्रश्न न सुटल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |