सातारा : विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघी शाहूनगरी सज्ज झाली असून, गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच सातार्यात काही सार्वजनिक गणेश मंडळांनी वाजतगाजत व ढोलताशांच्या गजरात व धूमधडाक्यात बाप्पांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेल्या. गुरुवारी तर सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया..’च्या गजरात सार्वजनिक मंडळांसह घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे.
विघ्नहर्त्यांच्या स्वागतासाठी जनजीवन आतुरले आहे. बाप्पांच्या आगमनामुळे जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, गणेशभक्तांच्या आनंदाला भरते आले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असून, अवघी शाहूनगरी सज्ज झाली आहे. त्यामुळे सातारा शहरासह अवघा जिल्हा बाप्पामय होणार आहे.
गणेशोत्सवाला गुरुवारपासून जल्लोषात सुरुवात होत आहे. बाप्पांच्या भक्तीचा महिमा सांगणार्या या उत्सवामुळे वातावरण बाप्पामय झाले आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच सातारा शहरातील विविध मानाच्या गणेश मंडळांतील मूर्तींच्या पारंपारीक वाद्य व ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणुका निघाल्या. मूर्तीच्या मार्गक्रमणामध्ये महागणपतीवर ठिकठिकाणी गणेशभक्तांकडून फुलांचा वर्षाव करुन पूजन करण्यात येत होते. तसेच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
दरम्यान, विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबरच घरोघरी अबालवृद्धांनी जय्यत तयारी केली आहे. बाप्पांच्या स्वागताच्या धांदलीने जिल्ह्यातील वातावरण गणेशमय झाले आहे. पूर्वसंध्येलाच गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरी बाप्पांच्या स्वागताची धांदल शिगेला पोहचली होती. घरगुती गणेशोत्सावासाठी गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ग्रेडसेपरेटरच्या कामामुळे वाहतुकीचे मार्ग बदलले असल्याने गणेशभक्तांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. तसेच शहरात मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कोडी होत होती.
शहराबरोबरच जिल्ह्यातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडप सजावटीची कामे जवळपास पूर्ण झाले. काही मंडळांचे कार्यकर्ते सजावटीच्या कामात मग्न असल्याचे चित्र रात्री उशीरापर्यंत दिसत होते. शहर व परिसरात ठिकठिकाणी मंडळांनी आकर्षक कमानी उभारून विद्युत रोषणाईही केली आहे. मंडळांनी देखावे व सजावट करण्यास सुरूवात केली आहे. पुढील अकरा दिवस उत्सवाचे असल्याने वातावरणाचा नुर पालटायला आता सुरूवात झाली आहे.मोठ्या गणेश मंडळांच्यामूर्ती गेल्या दोन दिवसांपासून वाजतगाजत प्रतिष्ठापनेसाठी आणल्या जात होत्या. बाप्पांच्या आगमनामुळे सपूंर्ण शहरासह अवघा जिल्हा बाप्पामय झाला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |