आता गावाच्या विकासात योगदान द्या : सरपंच जितेंद्र भोसले
नागठाणे : "नागझरी हे आदर्श गाव असून आम्ही करून दाखवले आहे.या,पहा,तुम्ही ही करून दाखवू शकता.सरपंच, सदस्यांनी प्रशिक्षणातून ज्ञान मिळाले आता गावाच्या विकासात योगदान द्या,"असे आवाहन सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी केले.
नागठाणे येथील श्री रामकृष्ण विद्यामंदिर येथे सातारा पंचायत समिती,सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, वर्ये यांनी संयुक्तपणे सातारा तालुक्यातील सरपंच,सदस्यांसाठी तीन दिवस प्रशिक्षण कार्यशाळाआयोजित करण्यात आली आहे.
पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे विजय जाधव, मान्यांचीवाडीचे रवींद्र माने,तज्ञ प्रशिक्षक प्रदीप पाटणकर,राजेश भोसले,निलीमा सन्मुख,नागझरीचे सरपंच जितेंद्र भोसले, विनायक पाठकजी यांनी विविध विषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
सातारा तालुक्यातील अपशिंगे, खोजेवाडी, भरतगाववाडी, काशिळ, कोपर्डे, तुकाईचीवाडी, सायळी(पुर्न), गणेशवाडी, रामकृष्णनगर, नागठाणे, सोनगाव तर्फ सातारा, धोंडेवाडी (कामेरी), देशमुखनगर, टिटवेवाडी, कामेरी या ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.
"नागझरी हे आदर्श गाव असून आम्ही करून दाखवले आहे.या,पहा,तुम्ही ही करून दाखवू शकता.सरपंच, सदस्यांनी प्रशिक्षणातून ज्ञान मिळाले आता गावाच्या विकासात योगदान द्या,"असे आवाहन सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी केले.