02:08am | Feb 16, 2020 |
फलटण : खुंटे, ता. फलटण येथे दोन गाड्या व पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे पाय बांधून डांबून ठेवलेली गायी व लहान वासरे आढळून आल्यानंतर तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, दि 14 रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास मौजे खुटे ता .फलटण येथे आयशर टेम्पो क्र. एमएच -25 - यु - ०९१५ व पिकअप गाडी क्र. एमएच - ११ - बीएल - ८३१७ या गाडीची तपासणी गुन्हे अन्वेषण विभाग सातारा व स्थानिक पोलिसांनी केली असता आयशर टेम्पो क्र . एमएच - २५ - यु - ०९१५ मध्ये पांढऱ्या रंगाचे पाठ शिंगी दोन बैल वय अदाजे १० वर्ष व काळया पांढऱ्या रंगाच्या चार गायी वय अंदाजे ४ वर्ष तसेच काळया पांढऱ्या रंगाची दाटीवाटीने १५ लहान वासरे वय अंदाजे १० ते १५ दिवसाची या सर्व गायी व वासरे क्रूरतेने पाय बांधून डांबून ठेवलेले आढळून आली.
तसेच दुसरी पिकअप गाडी क्र. एमएच - ११ - बीएल - ८३१७ मध्ये काळया पांढऱ्या रंगाची दाटीवटीने ३० लहान वासरे वय अंदाजे १० ते १५ दिवसाची क्रूरतेने पाय बांधलेली आढळून आली. तसेच एका पत्र्याच्या शेडमध्ये काळया पांढऱ्या रंगाची ८ लहान वासरे अंदाजे वय १० ते १५ दिवसाची क्रूरतेने पाय बांधलेली डांबून ठेवल्याची आढळून आली. याप्रकरणी शाहरुख जलील कुरेशी, वय २७ वर्ष. मंगळवार पेठ, फलटण, राजु हुसेन शेख, वय १९ वर्ष, रा. निरा वाघज, ता. बारामती, जि. पुणे व सुहेल जलील कुरेशी, वय २० वर्ष, रा. मंगळवारपेठ, फलटण, यांच्या ताब्यात असणारे आयशर टेम्पो क्र. एमएच - २५ - यु - ०९१५ व पिकअप गाडी क्र. एमएच - ११ - बीएल - ८३१७ मध्ये व पत्र्याचे शेडमध्ये जनावरे कोणत्याही प्रकारे खरेदी विक्रीच्या पावत्या नसलेले बेकायदेशीर जनावरे एका ठिकाणी पाय बांधलेले क्रूरतेने डांबून ठेवून त्यांची चारापाणीची कोणतीही व्यवस्था, वैदयकीय व्यवस्था असे व्यवस्थापन केलेले नसल्याचे पोलिसांना आढळून आल्याने बबन रघुनाथ साबळे, वय ४१ वर्ष, पो. हवा. फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी तिघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |