कोरेगाव : आसरे ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान, झालेल्या राजकीय वादावादीवरुन तसेच गणपती विसर्जनाच्यावेळी पुन्हा झालेल्या वादाच्या कारणावरुन चिडून जावून गावातीलच रुपेश सपकाळ, अनिल सणस, सुनिल सणस याच्यासह एकूण 16 जणांनी गावातील एकनाथ जरंडे, त्यांचा मुलगा हरिष जरंडे यांना बेदम मारहाण केली.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव तालुक्यातील आसरे येथे ग्रामपंचायत निवडणुकीपासून सत्ताधारी विरुध्द विरोधी असा राजकीय संघर्ष सुरु आहे. ग्रामसभेतही हमरीतुमरी झाल्याने वाद वाढला. दोन्ही बाजुच्या मंडळींनी पोलिसांकडे धाव घेवून एकमेकांच्या विरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत. एकनाथ हरिभाउ जरंडे, वय 51 हे गेली अनेक वर्षे कोरेगाव पंचायत समिती परिसरामध्ये एका चहा टपरीवर चहाचा व्यवसाय करीत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री साडेआठपर्यंत ते येथे असतात. 24 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एकनाथ जरंडे घरी परतत असताना त्यांचे चुलतभाउ तुकाराम जरंडे यांच्या घरी काही कामानिमित्त गेले. त्यावेळी तेथे लता जरंडे, नातू ओंकार हे घरात होते. त्याचवेळी एकनाथ जरंडे यांचा मुलगा हरिष तेथे आला. त्याने वडिलांकडे पैशाची मागणी केली. घरी गेल्यावर पैसे देतो असे एकनाथ जरंडे यांनी मुलाला सांगितले. त्याचवेळी रुपेश सपकाळ तेथे आला. गणपती विसर्जनावेळी झालेल्या वादावादीचा राग मनात धरुन त्याने ‘हर्याला बाहेर पाठवा’असे शिव्या द्यायला सुरुवात केली. तुमच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करतो असेही सांगत आरडाओरडा सुरु केला.
दरम्यान, तेथे धर्मराज सणस, सुनिल सणस, राजेंद्र पेठेकर, दिलीप पेठेकर, सागर पेठेकर, आशुतोष भिलारे, संतोष सणस, विठ्ठल सणस, देवेंद्र शिंदे, उत्तम शिंदे, रमेश चव्हाण, सिध्दाथ्र चव्हाण, ब्रम्हदेव चव्हाण, आशा पेठेकर, शिवाजी सणस व इतर असे एकूण 50 जणांचा जमाव जमल. या सर्वांनी एकनाथ जरंडे व हरिष जरंडे यांना मारहाण केली. या मारहाणीत एकनाथ जरंडे यांच्या खिशातील 15 हजार रूपये व गळयातील दोन तोळे सोन्याची माळ कुणीतरी हिसकावून घेतली. यानंतर सर्वजण तेथून पळून गेले. कोरेगाव येथे चहाच्या टपरीवर हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची फिर्याद रुपेश सपकाळ याने एकनाथ जरंडे यांच्या विरोधात यापुर्वीच दिली होती. मारहाणीच्या या घटनेनंतर पुन्हा जरंडे कुटुंबियांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |