04:29pm | May 09, 2019 |
सातारा : माण तालुक्यात शासनाने मंजूर केलेल्या चारा छावण्या सुरु आहेत. माण तालुक्यातील मोगराळे व वडगाव या चारा छावण्यांस आज भेट दिली. चारा छावणीतील जनावरांना शासनाच्या निकषानुसार चारा, पेंड व पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. चारा छावणीचे प्रस्ताव मंजूरीसाठी प्रलंबित असल्यास त्यावर तात्काळ निर्णय घ्या, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज केल्या.
दहिवडी येथील तहसील कार्यालयात टंचाई आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपायुक्त प्रतापराव जाधव, उपायुक्त निलीमा धायगुडे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सूनिल थोरवे, माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रोहयोंतर्गत सार्वजनिक कामांचे प्रस्ताव आले तर त्यास तात्काळ मंजूरी द्या, अशा सूचना करुन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले, टँकरच्या खेपा शंभर टक्के होण्यावर भर द्या, टँकरचे मॉनिटरींग जीपीएसच्या माध्यमातून मोबाईलद्वारे करावे. हे काम संबंधित तालुक्याचे तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी करावे. टँकरच्या खेपा लॉगबूकशीटशी पडताळून पहावे. धरणातून सोडण्यात येणारा पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठीच उपलब्ध करुन देण्यात यावा, शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच चारा छावण्यांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचे पालन चारा छावण्या तंतोतंत करतील यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केल्या.
विभागीय आयुक्तांनी टंचाईच्या उपायासंदर्भात विविध सूचना केल्या आहेत, या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पूढे म्हणाल्या, टंचाई भागातील पाणी उपसा शंभर टक्के बंद झाला पाहिजे. यासाठी महसूल विभाग, इरिगेशन विभाग यांनी समन्वयाने काम करावे. ज्या ठिकाणी अवैध पाणी उपसा होत असेल त्या ठिकाणचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने तात्काळ काढून टाकावे. प्रलंबित चारा छावणीचे प्रस्ताव दोन दिवसांत पाठवा. टंचाई उपाय योजनेसाठी अधिका-यांनी आता फिल्डवर येऊन काम केले पाहीजे. टंचाई कामात लक्ष केंद्रीत करुन कामे गतीने करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या.
ग्रामपंचायतींमार्फत नरेगाची कामे व टँकरच्या खेपांची टक्केवारी वाढविण्यावर योग्यरित्या काम केले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त यांनी माण तालुक्यातील ढाकणी तलावाची पाहणी केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |