01:34am | Sep 15, 2018 |
कोरेगाव : पुरोगामी विचारांच्या असंख्य निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कोरेगाव तालुका घडवला. या तालुक्यात कधीही नसणारा दहशतवाद अलिकडच्या काळात प्रचंड फोफावला असून कोरेगावकरांचा स्वाभिमान जागृत करुन कोरेगाव मतदारसंघात वाढलेला दहशतवाद परतवून लावण्यासाठी रविवारी कृतज्ञता गौरव सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती माजी जि. प. सदस्य किशोर बाचल यांनी दिली आहे.
जुन्या कोरेगाव जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासह, सामाजिक, राजकीय योगदान दिलेल्या विविध गावच्या ज्येष्ठांचा कृतज्ञता सोहळा येत्या रविवार दि. 16 रोजी सकाळी 11 वाजता नवीन एसटी स्टँड जवळच्या शिवरत्न मंगल कार्यालयात आयोजित केला असून त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बाचल बोलत होते.
माजी जि.प. सदस्य किरण बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली व कोरेगावचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते होणार्या या विशेष गौरव सोहळ्यात कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या भविष्यातील रणनितीची मांडणी करण्यात येणार आहे. बाचल पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणात या तालुक्याला एक वेगळे महत्त्व होते. कार्यकर्ते निष्ठेने नेत्यांच्या पाठिशी उभे राहून नेत्यांचा विचार, ध्येय-धोरणे सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे आपल्याच मातीतला एखादा सामान्य माणूस पुढे लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचा. अलिकडच्या काळात राजकारणाची भाषाच मोडून काढत काहींनी पाकिट संस्कृती या तालुक्यात आणली. कार्यकर्त्यांना दहशतीच्या जोरावर वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न केला. घराघरात दुही निर्माण करुन या तालुक्याचे संस्कार व ज्येष्ठांबद्दलचा आदर नाहीसा करुन टाकला. कोरगाव मतदारसंघाचा विकास मात्र यामुळे खुंटला असून टग्यांचीह आणि ठेकेदारांची संघटना आज मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी आता आपल्याच मतदार संघातील अगदी सामान्य कार्यकर्त्याला संधी देवून या तालुक्याच्या आणि कोरेगाव मतदार संघाच्या विकासाचे तोरण बांधायचा निर्धार या मेळाव्यात केला जाणार आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने जुन्या, जाणत्या ज्येष्ठांच्या गौरवासह त्यांचे विचार घेवून आम्ही पुढे जात असून आज संपूर्ण कोरेगाव शहरात बदलाचे वारे वाहत आहेत. त्याला निश्चित दिशा देण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीचे राजकारण कोरेगाव मतदार संघात सुरु आहे, त्याची किळस येवून नेतृत्व बदलासाठी अनेकजण बाजुला गेलेत. त्या सर्वांना एकत्रित करण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद गटनिहाय मेळाव्यांचे आयोजन केले असून रविवारी जुन्या कोरेगाव गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. हा मेळावा भविष्यातील कोरेगाव मतदारसंघाच्या विकासाची दिशा ठरवणार आहे. या मेळाव्यास जुन्या कोरेगाव गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही किशोर बाचल यांनी केले आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |