सातारा : सातारा पोलिस मुख्यालयातील कर्तव्य बजावत असलेल्या अक्षय सतीश कांबळे (मूळ रा.भरतगाव ता.सातारा) या पोलिसाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिसानेच याबाबत तक्रार दिली असून शाहूपुरी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहेे. दरम्यान, संशयिताने एका पोलिस ठाण्यात आत्महत्या नाट्याचा प्रयत्न केला असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली असून या सर्व प्रकाराने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील पिडीत तक्रारदार युवती त्याही पोलिस आहेत. संशयित अक्षय कांबळे व तक्रारदार युवती यांची ओळख आहे. या ओळखीचा गैरफायदा घेवून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशी लग्न करतो,’ असे सांगून आश्वासन दिले. लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने जून 2019 ते नोव्हेबर 2019 या कालावधीत राधिका रोड येथील एका खोलीत संशयिताने इच्छेविरुध्द वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले.
संशयित पोलिस अक्षय कांबळे याने तक्रारदार युवतीकडून 50 हजार रुपये उसने घेतले. गेल्या काही दिवसांपासून तक्रारदार युवतीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर संशयित त्याबाबत टाळाटाळ करु लागला. उसने घेतलेले पैसे मागितल्यानंतर ते पैसेही देण्यास संशयिताने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार युवतीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यानुसार पोलिस अक्षय कांबळे याच्याविरुध्द बलात्कार व फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्याला पोलिस कोठडी दिली.
बलात्काराचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी संशयिताला एका पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीवेळी तू तू मैं मैं झाल्याने गोंधळ झाला. वादावादी सुरु असतानाच संशयिताने विषाची बाटली काढली व ती प्राशन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संपूर्ण पोलिस ठाण्यात पळापळ झाली व संशयिताकडून विषाची बाटली ताब्यात घेण्यात आली. या सर्व नाट्य प्रकारानंतर संबंधितांचा ताबा घेवून त्यांना शाहूपुरी पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |