12:47am | Dec 15, 2019 |
सातारा : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन व मराठी विज्ञान परिषद, मुंबई आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यू इंग्लिश स्कुल, सातारा विद्यालयाच्या 'इंडिया डीड इट!' ह्या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावला. दि. १२ व १३ डिसेंबर रोजी ही स्पर्धा बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात पार पडली.
नाट्य आणि विज्ञान ह्यांचा मेळ साधून कलाकृतींना व्यासपीठ देणारी ही अभिनव स्पर्धा ऑक्टोबरमध्ये सहा विभागांत पार पडली होती. सुदर्शन रंगमंच, पुणे येथे पार पडलेल्या पुणे विभागीय स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुल, साताराने प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावरील आपला प्रवेश निश्चित केला होता.
आज भारत हवामानाचा अंदाज लावण्यात एक अग्रेसर देश मानला जातो. शेती आणि इतर अनेक क्षेत्रांतील निर्णयप्रक्रियेत हा अंदाज महत्वाची भूमिका बजावत आहे. हा शास्त्रीय अंदाज लावण्याची ताकद आपल्याकडे महासंगणकाच्या निर्मितीमुळे आली आहे. पण तीस वर्षांपूर्वी आपल्याकडे महासंगणक नव्हता. त्यावेळी असा संगणक मिळवण्याचे झालेले प्रयत्न, त्याला आलेले अपयश आणि त्यातून डॉ. विजय भटकर आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन बनवलेल्या परम महासंगणकाच्या निर्मितीमागचे नाट्य लेखक श्री जगदीश पवार ह्यांनी अत्यंत प्रवाही पद्धतीने उलगडून दाखविले आहे.
ह्या एकांकिकेचे दिग्दर्शन जगदीश पवार यांनी केले आहे. नेपथ्य व पार्श्वसंगीत मस्कु मोरे यांचे तर रंगभूषा व वेशभूषा रसिका केसकर यांची आहे. प्रकाशयोजना जगदीश पवार ह्यांनीच केली आहे.
न्यू इंग्लिश स्कुलच्या ह्या यशाबद्दल त्यांचे शाळा समिती अध्यक्ष श्री. अमित कुलकर्णी, सदस्य श्री. अनंत जोशी, शालाप्रमुख श्री सुनील शिवले ह्यांनी अभिनंदन केले आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |