सातारा : सातारा जिल्ह्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन अखेर १४ मे रोजी साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते होणार असल्याची माहिती क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे.
सातारा जिल्हा भौगोलिक दृष्ट्या किचकट आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात याठिकाणी पासपोर्ट कार्यालय व्हावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबतचा पाठपुरावा परराष्ट्र मंत्रालयाने केला होता. पुणे येथे पासपोर्ट काढण्यासाठी सातारा जिल्ह्यातील लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून जावे लागत होते. पूर्वी ही प्रक्रिया सातारा येथील जिल्हा विशेष शाखा येथे होत होती. परंतु पासपोर्टचे कामकाज ऑनलाईन झाल्यानंतर ही सर्व प्रक्रिया पुणे ते हलवण्यात आली होती.
पासपोर्ट काढण्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी तारीख दिली जात होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील लोकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी व मुलाखत देण्यासाठी पुणे येथील पासपोर्ट कार्यालय मध्ये जावे लागत होते. त्यामुळे अनेक लोकांचा या किचकट प्रक्रियेमध्ये वेळ वाया जात होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते संग्राम बर्गे यांनी सातारा येथे पासपोर्ट शिबिर आयोजित केले होते. यावेळी अनेक लोकांनी पासपोर्ट अधिकाऱ्यांना साताऱ्यात कार्यालय सुरू करावे याबाबत गळ घातली होती.
सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही साताऱ्यात पासपोर्ट कार्यालय व्हावे यासाठी अनेकदा पाठपुरावा केला होता. त्यानुसार परराष्ट्र मंत्रालयाने अखेर दखल घेऊन साताऱ्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरु केले होती. अखेर पासपोर्ट कार्यालयाची प्रतीक्षा संपली असून १४ मे रोजी सातारा येथील मध्यवर्ती पोस्ट कार्यालयात नूतनपासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होणार असून, या उद्घाटन सोहळ्याला परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पोलीस अधीक्षक संदीप पाटील खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये नवीन पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी आनंद ताकवले यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेले आहे
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |