01:28am | May 23, 2019 |
कराड : जैवविविधता मानवाचे जीवन आहे. जैवविविधतेशिवाय काहीही शक्य नाही. पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी जैवविविधता आहे. अनेक प्रजाती एक दुसर्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन रयत विज्ञान परिषदेचे समन्वयक, पर्यावरण अभ्यासक डॉ.सुधीर कुंभार यांनी केले.
ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेमध्ये जागतिक जैवविविधता दिनानिमित्त आयोजित जैवविविधता संवर्धन परिसंवाद व पर्यावरण तज्ञ डॉ.सुधीर कुंभार यांच्या लिम्का बुक ऑफ रेकार्ड झालेल्या निसर्गज्ञान भित्तीपत्रकाचे प्रदर्शन आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद, ज्ञानदीपचे अध्यक्ष आनंदा थोरात, संचालक संभाजी जमाले, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगली कॅम्पसच्या समाजकार्य पदवीच्या विद्यार्थ्यांनी तेजस्वी ढापरे, आरती पवार, भाग्यश्री भोसले, फरहिन पटेल यांची उपस्थिती होती.
डॉ.सुधीर कुंभार म्हणाले, सध्या आपण स्वत:च वन्यप्राण्यांच्या घरात (जंगलात) शिरत आहोत. त्यांना अडथळा निर्माण करीत आहोत आणि मग त्यांनी आमच्यावर हल्ला केला की, आम्हीच त्यांना ठार मारण्याची मागणी करतो. याशिवाय आपण निसर्गात कोणतीही प्रजाती उत्पन्न करू शकत नाही, त्यामुळे ती नष्ट करण्याचा सुद्धा आपल्याला कोणताही अधिकार नाही. आज जैवविविधतेला अनेक धोके आहेत. वातावरणातील बदल, प्रजाती नामशेष होणे, जंगलांचा र्हास हे सर्व जैवविधितेपुढील आव्हाने आहेत, यामुळेच ती टिकविण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे केवळ कागदावर जैवविविधता व्यवस्थापन समित्या तयार करून चालणार नाही, तर जैवविविधतेचे जतन करण्यासाठी लोकसहभाग वाढविला पाहिजे.
आनंदा थोरात म्हणाले, शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलाची होत असलेली तोड, नष्ट होत चाललेले वन्यजीवांचे अधिवास, जैविक संपत्तीचा अमर्याद वापर यामुळे प्रत्यक्षअप्रत्यक्षपणे जैविक उत्पादने व साधनसंपत्तीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्या तसेच एकूण जैवविविधतेच्या संपत्तीवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळेच पर्यावरण व जैवविविधता संवर्धनासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्यक आहे.
यावेळी जालिंदर काशिद यांनी मार्गदर्शन केले. अर्चना पाटील यांनी संस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पर्यावरणपुरक आणि पर्यावरण संवर्धनासाठीच्या उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान, संस्थेत डॉ.सुधीर कुंभार यांच्या हस्तलिखीत निसर्गज्ञान भित्तीपत्रकाचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध प्राणी, वनस्पती, किटक, सर्प इत्यादींचे छायाचित्रे व त्यांची शास्त्रीय माहिती देण्यात आली आहे. प्रदुषण, जैवविविधता, प्राणी आणि पक्षी यांचे संरक्षण, संवर्धन याबाबतच्या उपक्रमांची माहिती फोटोसह देण्यात आली आहे. किशोर थोरात, वैशाली ताटे, सुवर्णा सुर्वे यांनी स्वागत केले. तेजस्वी ढापरे यांनी आभार मानले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |