सातारा : आसू, ता. फलटण व पावशी, ता. इंदापूर या दोन्ही गावच्या सीमेवर असणार्या नीरा नदीच्या पात्रात बंधार्याचे आणि बोगद्याचे बांधकाम सुरु होते. कालच जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतू कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असतानाही याठिकाणी सुमारे शंभर कामगार एकत्र काम करीत होते. यासंदर्भात सातारा टुडे ने आज दुपारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने हे काम तत्काळ बंद पाडले.
याबाबत माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या सीमेवर असणार्या तावशी व आसू दरम्यान वाहत असलेल्या नीरा नदीच्या पात्रामध्ये एका बांधकाम कंपनीचे बंधार्याचे व बोगद्याचे काम सुरु आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात काल रात्रीपासून लॉक डाऊन केले होते. जिल्हा प्रशासनाने काल संध्याकाळपासूनच या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. परंतू आज सकाळपासून आसू येथील नीरा नदीच्या पात्रात सुमारे शंभरपेक्षा जास्त परप्रांतीय कामगारांद्वारे स्कायलाईन ही बांधकाम कंपनी याठिकाणी काम करीत होती. ही बाब आसू ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ फलटण ग्रामीण पोलीस तसेच प्रांताधिकारी कार्यालयास कळविली. परंतू प्रशासकीय पातळीवर कोणत्याही हालचाली होत नसल्याने ग्रामस्थांनी सातारा टुडे शी संपर्क साधला. यानंतर सातारा टुडे ने याबाबत सखोल माहिती घेवून वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत हे काम बंद पाडले. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करणार्या बांधकाम कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्यात आल्यामुळे आसू ग्रामस्थांनी या कंपनीवर तत्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |