मुंबई : नवी मुंबईत शिवसेनेत गटातटाचे राजकारण सुरु आहे. यात बाजी मारण्यासाठी भाजपनेही रणनीती आखल्याने सिडको संचालक पदासाठी घोडेबाजार तेजीत आहे.
पक्षातील असंतुष्टांची नाराजी दूर करण्यासाठी व इतर पक्षातील मातब्बर नेत्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी महामंडळ नियुक्त्यांची खैरात सत्ताधारी पक्षाकडून केली जाते. सिडको सारख्या आर्थिक आणि राजकीयदृष्टया वलय प्राप्त असलेल्या महत्त्वाच्या जागांसाठी पक्षांतर्गत चढाओढ असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच सिडको अध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाल्यानंतर सिडको संचालक पदासाठी युतीच्या स्थानिक नेत्यांनी आपले सोर्स लावण्यास सुरू केले आहेत. सिडको संचालक पदी वर्णी लागावी म्हणून अनेकजण देव पाण्यात ठेवून बसले आहेत. तीन संचालकांपैकी एक शिवसेना आणि दोन पदे भाजपच्या वाट्याला आहेत.
मुंबई ठाण्यात सत्ताधारी असलेली शिवसेना नवी मुंबई महापालिकेत मात्र विरोधी बाकावर आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना मानणारा एक गट आहे. तर शिवसेना उपनेता आणि झोपटपट्टी सुधार समितीचे सभापती विजय नाहटा यांच्या गटानेही आपल्या गोटातील कार्यकर्त्याची निवड व्हावी, यासाठी दबाव टाकला आहे. शिवसेनेतल्या या गटबाजीची नेहमी चर्चा होत असते. केवळ एका जागेसाठी विजय चौगुले आणि विजय नाहटा यांच्या दोन गटात चढाओढ निर्माण झाली आहे. सध्या शहकाटशहाचे राजकारण सुरु असले तरी संचालक पदी निवड करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत संचालकपदी कोणाला संधी मिळणार हे पाहणे औसुक्याचे आहे.
तर भाजपमधून नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, प्रकल्पग्रस्त नेते डॉ. राजेश पाटील तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांचे चिरंजीव निलेश म्हात्रे प्रयत्नशील असल्याचे समजते. डॉ. पाटील हे आमदार मंदाताई म्हात्रे समर्थक आहेत. त्यामुळे मंदाताई त्यांचे वजन कुणासाठी वापरणार, याबाबत कुतूहल आहे. तर रामचंद्र घरत हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत.
दरम्यान, शिवसेनेकडून वारंवार डावलले जात असल्यामुळे विजय चौगुले नाराज आहेत. या नाराजीचा फायदा उचलत चौगुले यांच्यासारखा मातब्बर आपल्याकडे असावा म्हणून भाजप त्यांना आपल्या कोट्यातील एक जागा देण्याची शक्यता आहे. अशी चर्चा नवी मुंबईतील शिवसेनेच्या गोटात रंगली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |