12:45am | Dec 09, 2019 |
सातारा : सातारा प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात पिटीशन रायटर,दस्त लेखनिक,मुद्रांक विक्रेत्यांनी बेकायदेशीरपणे पक्की पत्र्याची शेड अनेक वर्षांपासून टाकली आहेत. शासकीय लाईटचा वापर करत होतो, हे उघड होऊन त्यावर कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असून कारवाई केली जात नाही. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे हे सोमवार दि.९ डिसेंबर पासून आत्मक्लेष आंदोलन करणार आहेत. त्याला सातारच्या मनसेचा जाहीर पाठिंबा असून या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे शहर अध्यक्ष राहूल पवार यांनी सांगितले.
सातारच्या प्रांत कार्यालयाच्या आवारात अनेकांनी कोणतीच परवानगी न घेता पत्र्याची शेड, शासकीय लाईटचा वापर कित्येक वर्षांपासून करत आहेत.याबाबत अनेक वेळा जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, दुय्यम निबंधक अधिकारी यांना निवेदन दिली. या प्रकरणी चौकशीत केली असता या मंडळींनी अनाधिकृतपणे पत्र्याची शेड, लाईटचा वापर केला असल्याचे उघड होऊनही कारवाई केली जात नाही.
याविरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते निवेदन,प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही कारवाई होत नाही.
अशोक लिपारे हे प्रांत कार्यालयाच्या समोर दि.९ डिसेंबर पासून आत्मक्लेष आंदोलन करणार आहेत.त्याला मनसेचा जाहीर पाठिंबा असून कार्यकर्ते आंदोलनात सक्रिय सहभागी होणार आहेत, असे राहूल पवार यांनी सांगितले.
आंदोलनाला बळ मिळाले :अशोक लिपारे
"शासकीय जागेवर अतिक्रमण या प्रकरणात पहिल्या पासून आक्रमक भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.आता आत्मक्लेष आंदोलनाला पाठिंबा दिल्याने आता अधिक बळ मिळाले आहे,"अशी प्रतिक्रिया अशोक लिपारे यांनी व्यक्त केली.
मनसेचे कार्यालय उघडणार : अझर शेख
शासकीय जागेवर अतिक्रमण,फुकटात जागा आणि लाईट वापर केला तरी कारवाई केली जात नाही.येथे येणाऱ्या नागरिकांना माहिती देण्यासाठी लवकरच प्रांत कार्यालयाच्या आवारात मनसेचे कार्यालय सुरू करुन युवानेते मा.अमित ठाकरे साहेब यांच्या हस्ते उद् घाटन करण्याचा संकल्प मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचे शहर उपाध्यक्ष अझर शेख यांनी सांगितले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |