08:54pm | Apr 16, 2020 |
राजुरी : फलटण तालुक्यातील राजुरी येथील महिला सरपंच कौशल्या साळुंखे यांचे पती राजाराम साळुंखे यांच्या ऐन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या उचापतींमुळे राजुरी गावात असंतोष निर्माण झाला आहे. पत्नी सरपंच असल्याचा गैरफायदा घेवून साळुंखे यांनी गावातील मुख्य रहदारीचा रस्ता काटेरी झुडपे टाकून बंद केल्यामुळे गावातील लोकांना अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सरपंचांच्या उचापतखोर पतीवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. असे असताना फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठे व संवेदनशील गाव म्हणून राजुरीकडे पाहिले जाते. टाळेबंदीची प्रभावी अंमलबजावणी सर्वाधिक खेड्यांमध्ये केली जात आहे. खेडेगावातील 90 टक्के लोकांचा चरितार्थ हा शेतीवर चालत असतो. सध्या शेतातील कामेही बंद असून ग्रामस्थ घरात बसूनच कोरोनाचा प्रतिकार करीत आहेत. असे असताना राजुरी गावच्या महिला सरपंच कौशल्या साळुंखे या फक्त नावालाच सरपंच असून त्यांची इतर सर्व कामे त्यांचे पती राजाराम साळुंखे करीत असतात. कोरोनामुळे राजुरी गावातही टाळेबंदी करण्यात आली असून सर्वच दैनंदिन व्यवहार ठप्प करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महिला सरपंचाचे पती राजाराम साळुंखे यांनी फलटण-पंढरपूर मार्गावरील राजुरी बसस्थानकाजवळचा मुख्य रहदारीचा रस्ता प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अनाधिकाराने काटेरी झुडपे टाकून अडवला आहे. त्यामुळे गावातील लोकांना अत्यावश्यक सेवेच्या खरेदीसाठी वा विक्रीसाठी बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. शासकीय नियमानुसार लोक अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नेमून दिलेल्या वेळेत घराबाहेर पडतात व नेमून दिलेल्या वेळेतच घरी परततात. असे असताना सरपंचाच्या पतीने नसत्या उठाठेवी करत संपूर्ण राजुरी गावाला वेठीस धरण्याचे काम केले आहे. त्यामुळे बरड पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक बोंबले यांनी तत्काळ या प्रकरणात लक्ष घालून सरपंचाच्या पतीने बेकायदेशीररित्या बंद केलेला रस्ता त्वरित खुला करुन संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजुरी येथील ग्रामस्थांनी केलेली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |