महाबळेश्वर : येथे मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच असून या वर्षीच्या हंगामात ३०० इंच पाऊस झाला. याबाबत द वेदर चॅनेल इंडियानेदेखील नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये मेघालयातील मॉसिनराम,चेरापुंजीपेक्षा महाबळेश्वरात अधिक पाऊस झाल्याचे नमूद केले आहे. या वर्षी येथे आज पर्यंत ७६३१ मि. मि पाउस झाला आहे.
जगात सर्वाधिक पाउस पडण्याचे ठिकाण म्हणुन मॉसिनराम ला मागे टाकुन हा किताब महाबळेश्वर शहराने पटकाविला आहे. हवामान खात्याने नुकतीच या बाबतची आकडेवारी प्रसिध्द केली आहे. या आकडेवारी वरून यंदा मॉसिनराम शहराने आज पर्यंत साडे सहा हजार मि.मि चा टप्पा पार केला आहे तर, महाबळेश्वर शहराने साडे सात हजार मि. मि चा टप्पा पार केला आहे. तब्बल तेरा वर्षांनतर १ जुन ते आज अखेर येथे ३०० इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात येथे २३७ इंच पावसाची नोंद येथे झाली होती .
कोकण, पश्चिम घाटात आणि मध्य महाराष्ट्ात महाबळेश्वर हे असे आगळं वेगळं गिरीस्थान आहे कि या ठिकाणी नेहमी सरासरी पेक्षा अधिक पावसाची नोंद होते. महाबळेश्वर येथे सदाहरीत घनदाट जंगल उॅंच डोंगररांगा असे भौगोलिक स्थिती असुन येथे पावसाळयात थंडी आणि दाट धुक्याची चादर पसरलेली असते. अशा वातावरणात येथे वर्षा सहलीसाठी मोठया संख्येने पर्यटक येतात आणि पावसाचा आनंद लुटतात. पावसाळी पर्यटनाचे मापदंड महाबळेश्वर शहराने बदलण्यास भाग पाडले असुन पावसाळयात सहलीसाठी येत असलेल्या पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. यंदा देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक पाउस पडणारे ठिकाण म्हणुन महाबळेश्वर शहराची नोंद झाल्याने जगातील पर्यटकांना महाबळेश्वर शहराची दखल घेणे भाग पडले आहे.
सर्वांत जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून आजपर्यंत मेघालयातील चेरापुंजीचीही ओळख आहे. गेल्या काही वर्षांत थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचित असलेल्या महाबळेश्वरमध्ये चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ लागली आहे. त्याबाबतच्या नोंदीतून हे स्पष्ट होत आहे. द वेदर चॅनेल इंडियानेदेखील नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये महाबळेश्वर येथे चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे नमूद केले आहे. यामध्ये एक जूनपासून नोंदविलेल्यानुसार महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस पडल्याचे नमूद केले आहे. या पावसाने कोयना धारणाची पाणी पातळी वाढते तर चिपळूण ,महाडसह कोकनातील काही भागावर या पावसाच्या पाण्याचा परिणाम होतो.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |