02:06am | Jun 05, 2019 |
सातारा : समाजातील काही घटक सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियामुळे समाजकंटक जास्तच सक्रिय झाले असून समाजमाध्यमांवर येणारे फोटो, पोस्टची सर्वांनी खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याद्वारेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वच समाजघटकांनी आग्रही रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.
येथील शिवतेज हॉलमध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीवेळी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीवेळी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीपकुमार जाधव उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांना म्हणणे मांडण्यास सांगितले. यानुसार उपस्थित अनेकांनी अशा बैठका सणाच्या अगोदर घेण्याची विनंती प्रशासनाला केली तर बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याचे मत मांडले. उपस्थित मान्यवरांचे मत जाणून घेतल्यानंतर दिलेल्या सुचनांची दखल घेत यापुढील काळात योग्य त्या कालावधीत बैठकांचे नियोजन करण्याचे आश्वासन एसपी तेजस्वी सातपुते यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सामाजिक शांतता अबाधित राखत सण साजरा करण्याचे आवाहन करत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील म्हणाले, ठराविक घटक समाजात विष पेरण्याचे काम करत असतात. अलीकडच्या काळात त्यांचे हे काम सोशल मीडियामुळे सोपे झाले आहे. या पोस्टमुळे अनेक वेळा सामाजिक शांतता धोक्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे प्रत्येकाने सतर्कता बाळगत सोशल मीडियावरील पोस्टची खातरजमा करणे आवश्यक आहे. या पोस्टवर विश्वास न ठेवता सर्वांनी सामाजिक शांतता अबाधित राखण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |