सातारा : सातार्यातील राजवाडा बसस्टॉप नजीक पाच ते सहा युवकांनी वृध्दावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चंद्रेशेखर भुरके (वय 59, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) असे जखमी झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, भुरके हे राजवाडा येथील एका हॉटेलमध्ये काम करतात. दि. 15 रोजी रात्री साडेदहा वाजता ते घरी जात असताना नगर वाचनालयाजवळ एका मुलाने त्यांना हाक मारली. त्यामुळे ते थांबले. तेथे असणार्या इतर पाच ते सहाजणांनी अचानक त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यातील एकाने चाकूने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी भुरके यांनी हाताने तो वार चुकवला. त्यांच्या डाव्या हातावर चाकूचा वार वर्मी बसल्याने ते रक्तबंबाळ झाले. इतर संशयितांनी त्यांच्या पाठीत, बरकडीवर लाथाबुक्या मारून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
या सर्व प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मारहाण सुरू असताना त्यांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिकांची गर्दी झाली. लोक जमल्याने संबंधित हल्लेखोर तेथून पसार झाले. रिक्षा चालकांनी जखमी वृध्दाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी त्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता ते घाबरलेले होते. त्यांनी भीतीने हा प्रकार सांगितला नाही कारण हल्लेखोरांनी, ‘तू जर पोलिसात गेल्यास तर तुला जीवे मारीन,’ अशी त्यांना धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी आपण जिन्यावरून पडलो असल्याचे पोलिसांना सांगितले होते. परंतु मी जर गप्प बसलो तर मला आणखी त्यांच्यापासून धोका होईल, याची जाणीव त्यांना झाल्याने त्यांनी सिव्हिलमधील पोलिसांकडे घडलेल्या खरा प्रकार सांगितला.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |