सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलातील पोलिस हवालदार रमेश सदाशिव मदने (वय 48, मूळ रा.अंगापूर ता.सातारा) याला लाचप्रकरणी विशेष न्यायाधिश एन.एल.मोरे यांनी 4 वर्षाची सक्तमजुरी व 3 हजार रुपये दंड तो न दिल्यास 3 महिन्याची कैदेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, 2015 साली झालेल्या ट्रॅप प्रकरणात 3 हजार रुपयांची लाच त्याने स्वीकारली होती. शुक्रवारी लाचप्रकरणात शिक्षा लागल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पोलिस हवालदार रमेश मदने हा 2015 साली कोरेगाव पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत होता. त्यावेळी पोलिस ठाण्यामध्ये अमर चव्हाण (रा.एकंबे) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल होता. दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार रमेश मदने करत होता. संबंधित गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व कलमे कमी करण्यासाठी मदने याने अमर चव्हाण यांच्याकडे दि. 7 सप्टेबर 2015 रोजी 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर अमर चव्हाण यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.
सातारा एसीबी विभागात तक्रार दाखल झाल्यानंतर तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी तक्रार दाखल करुन त्याची पडताळणी केली. पोलिस हवालदार रमेश मदने याने लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबी विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. संबंधित गुन्ह्याचा तपास करुन दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले. दोन्ही पक्षाच्यावतीने न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाच्यावतीने ड. एल. के. खाडे यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी पोलिस रमेश मदने याला शिक्षा ठोठावली.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |