विडणी : महाड-पंढरपूर महामार्गावर विडणीनजीक राऊ-रामोशी पुलानजीक चारचाकीने दुचाकीस्वारास समोरून जोरदार धडक दिल्याने मोतीराम शंकर शिंदे (वय 45) हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी सौ. लता मोतीराम शिंदे या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत.
गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास महाड -पंढरपूर मार्गावर विडणीनजीक असणार्या राऊरामोशी पुलाजवळ पंढरपूरवरून फलटणच्या दिशेने सोमेश्वरकडे निघालेली हुंदाई कंपनीच्या कारने (क्र. एमएस 42 एस 2530) फलटणवरुन पिंप्रदकडे होंडावरून (क्र . एमएच 11 सीबी 6946) निघालेल्या पती-पत्नी यांच्या दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. यामध्ये मोतीराम शंकर शिंदे (दहिवडीकर) (वय 45) रा. पिंप्रद, ता. फलटण यांना जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर फलटण येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
हा अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहनाचा ड्रायव्हर तसाच जोरात पुढे गेला. मात्र, अपघाताच्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर असणार्या राऊरामोशी पुलाजवळच्या वळणावर असणार्या स्पीडब्रेकरवर जोरात आदळून ही गाडी रस्त्याच्या कडेला असणार्या झाडीत गेली. यातील तिघेजण सुखरुप बाहेर आले. त्यांना फलटण पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |