06:25pm | Oct 20, 2018 |
सातारा : २००९ साली मतदारसंघ पुनर्रचनेत पारंपारिक जावली-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ सोडून कोरेगावसारख्या नवख्या मतदारसंघातून आ. शशिकांत शिंदे यांनी निवडणूक लढवून शालिनीताई पाटील यांच्यासारख्या मुरलेल्या राजकीय धुरिणाला अस्मान दाखविण्याची किमया केली होती. तेव्हापासूनच शशिकांत शिंदे महाराष्ट्रात सर्वपरिचित झाले होते.
माथाडी कामगारांचे नेतृत्व स्विकारुन त्यांच्या न्याय व हक्कांसाठी आ. शशिकांत शिंदे हे नेतृत्व मुंबईमध्ये घडत होते. हा कोहिनूर शरद पवारांनी स्वभूमीत आणला. राष्ट्रवादीसारख्या नवख्या पक्षाची उमेदवारी स्विकारुन आ. शिंदे यांनी जावली-महाबळेश्वरचे शिवसेनेचे तत्कालीन आमदार सदाशिव सपकाळ यांचा पराभव करत हुमगावचा वाघ निवडून आला होता. राष्ट्रवादी हायकमांडवर आर्थिक निकष आरक्षणावरुन तोफ डागणार्या शालिनीताई पाटलांना राष्ट्रवादीने 2009 च्या निवडणुकीत नारळ दिला होता. त्यामुळे डॉ. शालिनीताई पाटील यांच्यासारख्या मातब्बर पुढार्यांविरोधात लढणार कोण? असा पेच राष्ट्रवादी सुप्रिमोंसमोर उभा राहिला होता. शेवटी राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी आ. शशिकांत शिंदे यांना कोरेगावमधून निवडणूक लढवावी लागेल, असा आदेश दिला. खा. शरद पवार यांचा आदेश शिरसावंद्य मानून आपला पारंपारिक मतदारसंघ सोडून शशिकांत शिंदेंनी कोरेगावचे शिवधनुष्य लिलया उचलले. डॉ. शालिनीताई पाटलांसारख्या मुरब्बी धुरिणीला धूळ चारुन आ. शशिकांत शिंदे तिसर्यांदा आमदार झाले. त्याची उतराई म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांना जलसंपदा मंत्रीपदी त्यांची नियुक्ती केली.
आ. शशिकांत शिंदे 'लंबी रेस का घोडा है !, असे खा. शरद पवार नेहमी म्हणतात. ते कृतीतून आ. शशिकांत शिंदे यांनी दाखवून दिलेले आहे. सध्या कोरेगावचा आमदार भूमिपुत्र असावा की नसावा, याबाबत खटाव-कोरेगाव मतदारसंघात घमासान सुरु आहे. पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसी, भाजपमध्ये आयात झालेल्या अनेकांनी मनगटाला झंडू बाम लावून सध्या कोरेगाव-खटावमध्ये शिमगा सुरु केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कोरेगाव-खटावमध्ये आयात लोकांची बेगमी सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून आ. शशिकांत शिंदे विरोधकांनी भूमीपूत्रांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी प्रत्येक कार्यक्रमामध्ये झडू लागल्या आहेत. टूक-टूक बॅटिंग करणार्यांना योग्यवेळी प्रत्युत्तर देवू, असा इशारा शशिकांत शिंदेंनी दिला होता. ते फक्त संधीची वाट पाहत होते. काल वाढदिवसाच्या निमित्ताने आ. शशिकांत शिंदे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकरी मेळावा आयोजित करुन सर्वांना व्यासपीठावर आणून हजारो जनसमुदायासमोर विराट शक्तीप्रदर्शन केले.
कोरेगाव-खटाव तालुक्यातील अनेकांच्या सभा आणि वाढदिवसाचे रेकॉर्ड या कार्यक्रमाने मोडले गेले आहे. पुढचा आमदार मीच, अशा वल्गना करणार्या अनेकांना आ. शशिकांत शिंदेंनी शक्तीप्रदर्शनाने त्यांची लायकी दाखवली आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्या शिलेदारांनीही पर्मनंट आमदार म्हणून केलेली जाहिरातबाजी जिल्ह्यातील लोकांचे लक्ष वेधून घेत होती. सध्या कोरेगाव-खटावमधील बी ग्रेडच्या काही स्वयंघोषित नेत्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. घरातील एक मत पडणार नाही, मात्र निवडणूकीच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच अनेकांना मंत्रीपद आणि महामंडळाची स्वप्ने पडू लागली आहेत. मुंबई, जावली, कोरेगाव या तिनही ठिकाणचे राजकारण करणार्या आ. शशिकांत शिंदेंना अस्मान दाखविण्याचे स्वप्न बघणार्यांची अवस्था 'गिरे तो भी टांग उपर' अशी झाली आहे. काल आ. शशिकांत शिंदेंनी कोरेगावमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या शक्तीप्रदर्शनाने विरोधकांना इथून पुढे 'औकातीतच' रहावे लागणार, असाच इशारा आ. शिंदे यांनी दिलेला आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |