05:49pm | Jul 30, 2019 |
सातारा : तळ्यात की मळ्यात या संभ्रमावरील आता पडदा उठला असून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ते बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथील गरवारे क्लब येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. यापूर्वी त्यांनी आज मंगळवारी सकाळी मुंबईत जाऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राष्ट्रवादीचा आमदारकीचा राजीनामा सुपूर्त केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा सातार्यातील एक भक्कम बुरुज ढासळल्याची चर्चा सातार्यात आहे.
रविवारी शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरूची या निवासस्थानावर नगर विकास आघाडीच्या नगरसेवक व पदाधिकार्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वांनीच बाबाराजे तुम्ही आता भाजपात जा, असा आग्रह केला होता. त्यावर त्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. चंद्रकांत पाटील यांच्याशी आपले बोलणे झाले असून पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाणार असल्याची भूमिका मांडली होती.
त्यानंतर संध्याकाळीच त्यांनी बुधवारी (दि. 31) मुंबई येथे मुंबई भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले होते. यानंतर राजकीय घडामोडींना आता वेग आला असून आज मंगळवारी सकाळी सकाळीच शिवेंद्रराजे हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी आपला राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर शिवेंद्रराजे यांचा भाजप प्रवेश आता निश्चित झाला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये चिंतेचे, तर भाजपामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |